सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डचे फोन; म्हणाला, ‘मी त्यांना उत्तरे द्यायचो, तेव्हा पोलीस…’

मुंबई तक

सुनील शेट्टी त्याच्या दमदार भूमिका आणि कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टी मीडियाशी संवाद साधत असताना त्याने सांगितले की, त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा त्याला अंडरवर्ल्डमधून रोज फोन यायचे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sunil Shetty : Bollywood : बॉलिवूडचा (Bollywood ) दमदार अभिनेता अण्णा सुनील शेट्टी (Sunil Shetty) त्याच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या OTT वेब सीरिज ‘हंटर टूटेगा नहीं तोडेगा’मुळे तो चर्चेत आहे. यामधील सुनील शेट्टीच्या अभिनयाला चाहते पसंती दर्शवत आहेत. तसं जर पाहायला गेलं तर, सुनील शेट्टी त्याच्या दमदार भूमिका आणि कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टी मीडियाशी संवाद साधत असताना त्याने सांगितले की, त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा त्याला अंडरवर्ल्डमधून रोज फोन यायचे.

सुनील शेट्टीला 90 च्या दशकात अंडरवर्ल्डमधून फोन यायचे?

एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, ‘मुंबईत त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉनचे वर्चस्व होते. मला रोज फोन यायचे. धमक्या मिळायच्या. मी हे करेन, मी ते करेन, मी ही त्यांना शिवीगाळ करायचो. पोलीस आणि काही लोक मला विचारायचे, तू वेडा आहेस का? रागाच्या भरात ते लोक तुमच्यासोबत काहीही करू शकतात. मी पण म्हणायचो, मी काही चुकीचं केलं नाही, मी चुकीचा नाहीये. माझे रक्षण करा.’

सुनील शेट्टी पुढे म्हणाला, ‘मी माझी मुलगी अथिया आणि मुलगा अहान यांना कधीच सांगितले नाही की मी माझ्या आयुष्यात काय केले आहे. मी पण काही विचित्र गोष्टीही केल्या आहेत. एकदा मला दुखापत झाली होती ती पण मी स्वतःहूनच बराही झालो होतो. याबाबत मी कोणालाही काही सांगितलं नाही. त्यानंतर मी माझा फिटनेस प्रवास सुरू केला. माझ्या दोन्ही मुलांना याबद्दल माहिती नाही. मी नेहमी लोकांना सांगतो की वेळ हा एक चांगला डॉक्टर आहे जो सर्व काही बरं करतो.’

‘मुलांवर चांगले संस्कार घडावेत म्हणून घेतले होते कष्ट अन्..’- सुनील शेट्टी

या मुलाखतीत सुनील शेट्टीने असेही सांगितले की, त्याच्या खोडकर वर्तनामुळे त्यांना मुंबईत अनेकदा घर बदलावे लागले. पुढे म्हणाला, ‘ज्या ठिकाणी गुंडांच्या टोळ्या तयार व्हायच्या त्या ठिकाणी मी राहत होतो. पण याचा परिणाम मी माझ्या मुलांवर होऊ दिला नाही. कालांतराने मी घर बदलले. माझ्या मुलांनी चांगल्या ठिकाणी राहावं यासाठी मी खूप कष्ट केले. मी घर घेतल्यावर मी एक चांगली जागा घेतली, जिथे चांगले लोक, चांगली संस्कृती आणि चांगल्या शाळा होत्या. सुशिक्षित लोक राहत होते.’

हे वाचलं का?

    follow whatsapp