हरीओम सिनेमात ‘हे’ नवे कलाकार साकारणार भूमिका

मुंबई तक

लवकरच हरीओम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. दरम्यान या पोस्टरवर असलेल्या दोन तरूणांबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर यावरून पडदा उठला आहे. हरीओम सिनेमाच्या पोस्टरवर हरीओम गाडगे आणि गौरव कदम हे कलाकार आहेत. हरीओम आणि गौरव हे दोघंही या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

लवकरच हरीओम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. दरम्यान या पोस्टरवर असलेल्या दोन तरूणांबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर यावरून पडदा उठला आहे. हरीओम सिनेमाच्या पोस्टरवर हरीओम गाडगे आणि गौरव कदम हे कलाकार आहेत.

हरीओम आणि गौरव हे दोघंही या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांमुळे मराठी सृष्टीला दोन नवखे कलाकार मिळणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये हरीओम आणि गौरव यांच्या खांद्यावर जगदंब आणि जय दुर्गे असं लिहिलेलं दिसतंय. शिवाय हे दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे आहेत.

हे वाचलं का?