पहिल्याचं तैमूर..दुसऱ्याचं काय? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आज दुसऱ्यांदा आई बनली आहे. करिनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याच मुद्द्यावरून करिना आणि सैफ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत. फॅन्सकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर दुसरीकडे सैफ आणि करिनाचे फॅन्स नव्या बाळासाठी नावंही सुचवत आहेत. Babur,Aurangzeb,Muhammad Azam Shah,Bahadur Shah,Jahandar Shah these are some finely picked names.. please let us […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आज दुसऱ्यांदा आई बनली आहे. करिनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याच मुद्द्यावरून करिना आणि सैफ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत. फॅन्सकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर दुसरीकडे सैफ आणि करिनाचे फॅन्स नव्या बाळासाठी नावंही सुचवत आहेत.

2016 मध्ये करिनाने तैमूरला जन्म दिला होता. बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर सैफ आणि करिनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. यावरून फार वादंही निर्माण झाला होता. 14 व्या शतकात भारतावर चालून आलेल्या तैमूरलंग या क्रूर मोगलाने भारतात थैमान माजवलं होतं. अशा क्रूर व्यक्तीचं नाव सैफने मुलाला का दिलं असा सवाल त्यावेळी नेटकऱ्यांनी केला होता.

तर आता नव्या बाळाचं नावं काय ठेवणार याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. तर अनेकांनी बाबर असं नावंही सैफिनाच्या मुलासाठी सुचवलं आहे. शिवाय काहींनी तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब असंही सोशल मीडियावर लिहिलं होतं. या मुद्द्यावरून काहींनी सैफ आणि करिनाला ट्रोलंही केलंय. यावेळी मोहमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशी नावं नव्या बाळासाठी सुचवली आहेत.

अनेक स्टार किड्सप्रमाणे करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. मात्र आता दुसरीकडे तैमुर अली खानवर मीम्स तयार केले जात असून ते सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतायत.

हे वाचलं का?

    follow whatsapp