DadaSaheb Phalke Awards : द काश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Dadasaheb Phalke International Film Festival 2023 :

मुंबई : देशभरात सर्वाधिक चर्चा आणि गदारोळ झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स‘ (The Kashmir Files) या चित्रपटाने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 (DadaSaheb Phalke Awards 2023) मध्ये मोठा मान मिळवला आहे. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर अशा दिग्गज अभिनेत्यांनी सजलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. (The Kashmir Files’ received DadaSaheb Phalke Award in Best Picture)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील जनतेला समर्पित केला आहे. काश्मीर फाइल्स हा चित्रपट २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २५२.९० कोटी होते. तर जगभरात ३४०.९२ कोटींची कमाई केली होती. या दरम्यान, या सिनेमावरून बराच गदारोळ झाला होता. राजकीय पक्षांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले होते.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला व्हल्गर आणि प्रोपगंडा म्हणणारे ‘नदव लॅपिड’ कोण आहेत?

ADVERTISEMENT

आणखी कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?

RRR – फिल्म ऑफ द इयर

ADVERTISEMENT

काश्मीर फाइल्स – सर्वोत्कृष्ट फिल्म

आलिया भट्ट – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (गंगुबाई काठियावाडी)

रणबीर कपूर – सर्वोत्कृष्ट अभिनेता (ब्रह्मास्त्र भाग 1)

वरुण धवन – सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक (भेडिया)

ऋषभ शेट्टी – सर्वोत्कृष्ट प्रॉमेसिंग अभिनेता (कांतारा)

अनुपम खेर – मोस्ट व्हर्सटाइल अॅक्टर (द काश्मीर फाइल्स)

रुद्र: द एज ऑफ डार्कनेस – सर्वोत्कृष्ट वेब सिरीज

अनुपमा – टीवी सिरीज ऑफ द इयर

तेजस्वी प्रकाश – सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री (नागिन ६)

झैन इमाम – सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता (फना – इश्क इन मरजावां)

“द कश्मीर फाईल्स न बघणाऱ्यांना दोन वर्षाचा तुरुंगवास असा कायदा करायला हवा”

पैसे घेऊन दिला पुरस्कार?

दरम्यान, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी या पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा देशातील चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा राष्ट्रीय सन्मान आहे. मात्र ज्या संस्थेने मुंबईत नुकतचं या पुरस्कारांचे वितरण केलं, त्याचं नाव दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार आहे. या दोन्ही पुरस्कारांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. ही संस्था ज्यांची क्षमताही नाही अशा लोकांना पैसे घेऊन पुरस्कार देत आहे, असा आरोप पुसाळकर यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT