एका पाठोपाठ एक फ्लॉप.. बॉक्स ऑफिसवर धाडधाड का आपटतंय बॉलिवूड?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड म्हणा किंवा हिंदी सिनेसृष्टीसाठी कठीण काळ सुरू आहे. कोव्हिडच्या दरम्यान लॉकडाऊन लागला. त्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं. थिएटर्स, मॉल्स बंद झाल्याने कमाई ठप्प झाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनेही सिनेसृष्टी हादरली. यानंतर देशातल्या अनेक स्टार्सना आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये ड्रग्ज प्रकरणात हजेरी लावलेलं पाहिलं. कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तसंच लॉकडाऊनही संपला. […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड म्हणा किंवा हिंदी सिनेसृष्टीसाठी कठीण काळ सुरू आहे. कोव्हिडच्या दरम्यान लॉकडाऊन लागला. त्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं. थिएटर्स, मॉल्स बंद झाल्याने कमाई ठप्प झाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनेही सिनेसृष्टी हादरली. यानंतर देशातल्या अनेक स्टार्सना आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये ड्रग्ज प्रकरणात हजेरी लावलेलं पाहिलं.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तसंच लॉकडाऊनही संपला. निर्बंध शिथील झाले, थिएटर्स सुरू झाले शूटिंग सुरू झालं. मत्र प्रेक्षक सिनेमागृहातून गायबच झाला. कारण लॉकडाऊनच्या दोन वर्षात त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मची सवय लागली आणि ती सवय त्याची गरजही बनली. मागच्या सहा महिन्यांपासून बॉलिवूडला एका पाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनाच सामोरं जावं लागतं आहे. बॉलिवूडला सातत्याने आपटीबार का सहन का करावा लागतो आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडच्या दिग्गजांनी यावर मतं मांडली आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणतात कोव्हिडमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या
तरण आदर्श म्हणतात कोव्हिडच्या तीन लाटांमध्ये दोन वर्षे गेली. त्यात ऑडियन्सची आवड प्रचंड बदलली. प्रेक्षकांना वर्ल्ड सिनेमाचं एक्स्पोजर मिळालं. त्यामुळे त्या सिनेमांची तुलना बॉलिवूडशी अगदी साहजिकपणे होऊ लागली. त्यामुळे लोकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली. लॉकडाऊनच्या नंतर काश्मीर फाईल्स, सूर्यवंशी, भुलभुलैय्या २, गंगुबाई काठियावाडी, आरआरआर, केजीएफ, पुष्पा सारख्या सिनेमांनी चांगला व्यवसाय केला. यावरून हे स्पष्ट झालं की लोकांना मनोरंजन हवं आहे मात्र त्याच्या नावे तुम्ही काहीही दाखवला तर ते सिनेमाकडे वळणार नाहीत.
मला तर असं वाटतं की आता मसाला सिनेमा तयार करणं जास्त कठीण झालं आहे. साऊथमधल्या सिनेमांची जादू बघा. तिथले डायरेक्टर ज्या पद्धतीने मसाला फिल्म्स आणत आहेत ते बॉलिवूडच्या फिल्ममध्ये नाही. राजामौलींची स्तुती हॉलिवूडपर्यंत झाली आहे. अशात आपल्याकडे आऊट ऑफ बॉक्स जाऊन कुणी विचार करतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे असं तरण आदर्श म्हणतात.