Parenting Tips : पालकांच्या 'या' सवयी मुलांच भविष्य करतात खराब, आजच बदला - parenting tips sign of competitive parent kill future of children - MumbaiTAK
नॉलेज बातम्या

Parenting Tips : पालकांच्या ‘या’ सवयी मुलांच भविष्य करतात खराब, आजच बदला

पालक मुलं जन्माला आल्या आल्याच त्याच्यावर अपेक्षाच ओझ टाकत असतात. जसे आमच्या मुलाला अमुक तमुक बनवायचंय. त्याला आम्ही मोठा डॉक्टर, इंजिनियर बनवू. मुलाची स्वत:ची इच्छा काय असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही
Updated At: Nov 21, 2023 19:02 PM
Parenting tips Sign of competitive Parent kill future of children

Sign of competitive Parent : प्रत्येक पालकांना त्यांचा मुलगा अभ्यासात, खेळात चांगला असावा असे नेहमीच वाटते. यासाठी पालक मुलांकडून खूप अपेक्षा ठेवतात. जसे मुलांने वर्गात अव्वल यावे. तसेच शाळेच्या इतर अॅक्टीव्हिटीमध्ये सुद्धा त्याने स्वत:ला चांगल्या परफॉर्मन्स द्यावा. प्रत्येक पालक त्यांच्या मुला/मुलींकडून याच अपेक्षाच ठेवत असतो. पालकांच्या या अपेक्षांमुळे आणि काही सवयीमुळे मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे पालकांनी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात. (Parenting tips Sign of competitive Parent kill future of children)

पालक मुलं जन्माला आल्या आल्याच त्याच्यावर अपेक्षाच ओझ टाकत असतात. जसे आमच्या मुलाला अमुक तमुक बनवायचंय. त्याला आम्ही मोठा डॉक्टर, इंजिनियर बनवू. मुलाची स्वत:ची इच्छा काय असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही.तसेच शाळेत गेल्यावर त्याने प्रत्येक विद्यार्थ्याशी स्पर्धा करावी. वर्गातून अव्वल यावे. खेळातही त्याने मेडल मिळवावे,अशा अनेक अपेक्षा पालकांकडून लादल्या जातात.या सवयी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानकारक ठरतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी नेमकं मुलांशी कसे वागावे, हे वाचूयात.

हे ही वाचा : WhatsApp Ban : …तर आयुष्यभरासाठी व्हाट्सअ‍ॅप होईल बॅन! ‘या’ चुका आजच टाळा

दुसऱ्या मुलांशी तुलना टाळा

अनेक पालकांना त्यांच्या मुलाची इतर मुलांशी तुलना करायची सवय असते. जसे उदाहरण द्यायचं झालं तर, तुझ्या मित्राला चांगले गुण मिळाले, तुला का नाही मिळाले. तुझा मित्र खेळातही चांगला आहे, तु काही नाही. अशी तुलना पालक आपल्याच मुलाची इतर मुलाशी करून बसतात. ज्यामुळे मुलांमध्ये खुप निराशा येते. त्यामुळे आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणे टाळले पाहिजे.

पालकांमध्येच रंगते स्पर्धा

अनेकदा पालक मित्रांमित्रांमध्ये स्पर्धा लावतातच, त्यासोबत स्वताचीही इतर पालकांशी स्पर्धा लावतात. जसे मुलाच्या मित्राने त्याची आई कशी टिफीन देते. त्याप्रमाणे तुम्ही देखील त्यापेक्षा चांगले टिफिन देण्याचा प्रयत्न करता. ज्यामुळे पालकांमध्येच स्पर्धा रंगते. हे देखील पालकांनी टाळले पाहिजे.

हे ही वाचा : Rohit Sharma : “सूर्यकुमारवर विश्वास नव्हता, तर…”, गंभीर-अक्रमने रोहितला सुनावलं

मुलांचा परफॉर्मन्स

काही पालक मुलांच्या परफॉर्मन्स खुप जास्त लक्ष देतात. ही चांगली देखील गोष्ट आहे. पण मुलांची तुलना झाली नाही पाहिजे. जर तुमच्या मुलाचे त्याच्या मित्रापेक्षा कमी गुण आले तर त्यावरून त्याला बोलल नाही पाहिजे. तसेच इतर स्पोर्टस अॅक्टीव्हीटीतही त्याची तुलना टाळली पाहिजे. याउलट तो या गोष्टीत कसा चांगला होईल याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे