RBI चा नवा नियम! बँकेला ग्राहकांना दररोज द्यावे लागणार 5000 रुपये, कारण…

रोहिणी ठोंबरे

रिझर्व्ह बँकेने 13 सप्टेंबर रोजी एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले की, स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे कर्ज देणाऱ्या संस्थांना बँकेच्या कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत परत करावीत. असे न केल्यास बँकांना, ग्राहकाला प्रत्येक 1 दिवसाच्या विलंबासाठी 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

ADVERTISEMENT

5000 Fine per day RBI Orders Banks NDFC to release property papers Within 30 days of Loan Repayment
5000 Fine per day RBI Orders Banks NDFC to release property papers Within 30 days of Loan Repayment
social share
google news

RBI Orders : एखादी बँक किंवा कर्ज देणारी संस्था तुम्हाला दररोज 5000 रुपये दंड म्हणून देते जरा, असा विचार करून पाहा. हो तुम्ही हे बरोबर वाचत आहात. दंड घेत नाही तर देत आहे. कारण साधारणपणे बँका आपल्याकडून दंड घेतात. पण RBI चा (Reserve Bank of India) नवा नियम आला आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हा नियम लागू होईल. बँक आणि एनबीएफसीने (NDFC) एका दिवसाचाही उशीर केल्यास त्यांना दररोज 5000 रुपये ग्राहकांना द्यावे लागतील. हे मालमत्तेची कागदपत्र ते मालमत्ता गहाण ठेवण्यास होणारा विलंब यासंबंधित आहे. (5000 Fine per day RBI Orders Banks NDFC to release property papers Within 30 days of Loan Repayment)

गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेताना, मालमत्तेची कागदपत्र कर्जासाठी गहाण म्हणून बँक किंवा गैर-वित्तीय बँकेकडे जमा करावी लागतात. अनेक वेळा लोक स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्ता गहाण ठेवतात. कर्जाची परतपेड केल्यानंतर, बँका किंवा बिगर-वित्तीय बँका तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे परत करण्यास सतत विलंब करतात जे तुम्ही बँकेत जमा केले होते.

वाचा: Samruddhi Accident :…तर 12 जणांचे वाचले असते प्राण; RTO अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

सध्या अशा तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेने 13 सप्टेंबर रोजी एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले की, स्थायिक किंवा अस्थायिक मालमत्तेची कागदपत्रे कर्ज देणाऱ्या संस्थांना बँकेच्या कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत परत करावीत. असे न केल्यास बँकांना, ग्राहकाला प्रत्येक 1 दिवसाच्या विलंबासाठी 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

एवढंच नाही तर, संपत्तीची कागदपत्रे गहाण ठेवून दिलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर, कागदपत्रे परत करण्याची कालमर्यादा आणि ठिकाण हे कर्ज मंजुरीच्या पत्रातच स्पष्ट नमूद करावे, असे सेंट्रल बँकेने म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp