Amazon Great Indian Festival Sale 2024 : स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर छप्परफाड सूट, आताच करा खरेदी नाहीतर...
Amazon Great Indian Festival Sale 2024 : सेलमध्ये तुम्हाला मोबाईल आणि ॲक्सेसरीजच्या खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये Apple, OnePlus, Samsung, Realme, Honor, iQOO, Poco, Xiaomi सारख्या ब्रँडचे स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच लॅपटॉप,स्मार्टफोन आणि हेडफोन 75टक्के सूट देण्यात आली आहे. टीव्ही आणि फ्रिजवर 65 टक्के सुट दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
Apple Iphone मिळतोय इतक्या स्वस्तात
टीव्ही आणि फ्रिजवर 65 टक्के सूट
हा सेल सध्या प्राईम मेंबरसाठी सूरू आहे
Amazon Great Indian Festival Sale 2024 : अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टीवल सेल येत्या 27 सप्टेंबर 2024 पासून सूरू होणार आहे. पण असे असले तरी प्राईम मेंबर्ससाठी आजपासूनच हा सेल सूरू झाला आहे. या सेलमध्ये अॅमेझॉनने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर यासह इतर इलेक्ट्रॉनिक ब्रँडवर भरघोस सुट दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक गँजेट किंवा इतर वस्तु खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आताच या सेलमध्ये खरेदी करा. दरम्यान या अॅमेझॉन सेलवर नेमक्या काय काय डिल ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत? ते जाणून घेऊयात. ( amazon great indian festival sale 2024 announced know the details and exclusive deals read full article)
ADVERTISEMENT
या वस्तुंवर 'इतके' टक्के सूट
या सेलमध्ये तुम्हाला मोबाईल आणि ॲक्सेसरीजच्या खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये Apple, OnePlus, Samsung, Realme, Honor, iQOO, Poco, Xiaomi सारख्या ब्रँडचे स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच लॅपटॉप,स्मार्टफोन आणि हेडफोन 75टक्के सूट देण्यात आली आहे. टीव्ही आणि फ्रिजवर 65 टक्के सुट दिली आहे. या सूटच्या माध्यमातून तुम्हाला कमी किमतीत वस्तू खरेदी करता येणार आहेत.
अॅमेझॉनच्या साईटवर Apple Iphone 13 ची किंमत ही 59 हजाराच्या घरात आहेत. मात्र या सेलमध्ये आयफोन 13 हा 41 हजार 180 रूपयांना मिळतो आहे. पण ही डिल फक्त प्राईम मेंबर्ससाठी असणार आहे. तसेच 40 हजार किंमत असलेला Honor 200 5G फोन हा सेलमध्ये 26 हजारांना मिळतोय.
हे वाचलं का?
हे ही वाचा : India Today Conclave : 'मुंबई'च्या 'तुंबई'वरून ठाकरेंनी CM शिंदेंना घेरलं, ''थिएटर नाही जाऊन पिक्चर बघायला...''
मागील वर्षीचा फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 Ultra 5G सध्या Rs. 74,999 (हा फोन रु. 1,44,999 ला लॉन्च करण्यात आला होता आणि अलीकडेच Amazon वर रु. 84,999 ला लिस्ट करण्यात आला होता). खरेदीदारांना या डिलवर अतिरिक्त 2000 रूपये ही डिस्काऊंट देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M35 5G ची किंमत 24 हजार 499 देण्यात आली आहे. पण सेलमध्ये हा स्मार्टफोन 14 हजार 999 रूपयांना मिळणार आहे. तसेच Galaxy M15 5G ची किंमत 15,999 आहे,पण सेलमध्ये हा फोन 10,999 रूपयांना मिळणार आहे.
ADVERTISEMENT
iPad (10th Generation, 64GB)ची साईटवर 44,900 रूपये आहे. तर सेलवर हा आयपॅड 29 हजार 999 रूपयांना मिळणार आहे.Samsung Galaxy Tab S9 FE मॉडेलची किंमत 34,900 रूपये आहे. तर सेलमध्ये हा टॅब 26,999 रूपयांना मिळणार आहे.
ADVERTISEMENT
Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये वायरलेस ऑडिओ डिव्हाइसेस आणि स्मार्ट टीव्ही देखील सवलतीत मिळत आहेत. Sony WH-1000XM5 हेडफोन्सची किंमतप 29,900 रूपये आहे, पण सेलमध्ये हे 25,990 रूपयांना मिळणार आहे. Samsung च्या D-Series 43-इंच LED TV ची किंमत आधी 41,990 रूपये आहे. पण सेलमध्ये 36,990 रूपयांना हा टीव्ही मिळणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात 4500 झाले खात्यात डिपॉझिट, तुमचे पैसै आले का?
दरम्यान हा सेल सध्या प्राईम मेंबरसाठी सूरू आहे.उद्यापासून इतरांसाठी हा सेल सूरू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या सेलचा आनंद घेता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT