Apple चा सर्वात जबरदस्त फोन आज होणार लॉन्च! भारतात कधी होणार माहितीय का? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

iphone !6 Launch Event Details
iphone !6 Launch Event Details
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयफोन 16 सीरिज होणार लॉन्च

point

जाणून घ्या या नव्या मोबाईलचे भन्नाट फिचर्स

point

आयफोन 16 सीरिजच्या लॉन्च इव्हेंटबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती

Apple iphone 16 Series Launch Event : अ‍ॅपल मोबाईल कंपनीचा एक मोठा इव्हेंट आज होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट रात्री 10.30 वाजल्यापासून सुरु होईल. बहुप्रतीक्षित असलेल्या आयफोन 16 (iphone 16) आणि आयफोन 16 प्रो (iphone 16 Pro) सीरिजला लॉन्च केलं जाणार आहे. याचसोबत अ‍ॅपल वॉच सीरिज (Apple Watch Series 10, Apple Watch Ultra 3 आणि Apple Watch SE Model) लाही लॉन्च केलं जाणार आहे. अ‍ॅपलच्या या इव्हेंटची टॅगलाईन इट्स ग्लोटाईम (Its Glowtime) अशी आहे. या इव्हेंटला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट अ‍ॅपल टीव्ही (Apple TV) आणि यू ट्यूब (You Tube) वर लाईव्ह पाहू शकता. यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी अ‍ॅपल चॅनलवर जावं लागेल. या इव्हेंटची सुरुवात रात्री 10.30 वाजता होईल. (A big event of Apple mobile company will take place today. This event will start at 10.30 pm Indian time)

ADVERTISEMENT

विज्युअल इफेक्ट्समध्ये होणार बदल 

अ‍ॅपलने या इव्हेंटची टॅगलाईन इट्स ग्लोटाईम अशी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इव्हेंटचा लोगो आज लॉन्च होणाऱ्या आयफोनमध्ये विज्युअली बदल दाखवतो. नोटिफिकेशन्स इफेक्टसमध्येही बदल झालेला पाहू शकता. नवीन आयफोनसाठी अ‍ॅपल इन्टिलीजन्स (Apple Intelligence) मिळणार. अ‍ॅपलच्या या मोबाईलमध्ये ओपन ए आयचा (OpenAI) चा चॅट जीपीटीचं (ChatGPT-40) इंटिग्रेशनही पाहायला मिळू शकतं. आयफोनमध्ये चॅट जीपीटी 40 (ChatGPT-40) चा सपोर्टही समाविष्ट केला आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

आयफोन 16 सीरिज होणार लॉन्च

अ‍ॅपल आजच्या इव्हेंटमध्ये आयफोन 16 (iphone 16) लाइनअपला लॉन्च करणार आहे. या इव्हेंटमध्येही गतवर्षीप्रमाणे आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्सला लॉन्च केलं जाईल. या सर्व मोबाईलमध्ये नवीन A18 चिपसेटचा वापर केला जाईल. सर्व मॉडेलमध्ये स्वत:चं एक यूनिक फिचरही असू शकतं.

हे वाचलं का?

कॅमेरा डिजाईनमध्ये होणार बदल

आयफोन 16 च्या कॅमेरा डिजाईनमध्ये बदल झालेला दिसू शकतो. ज्यामुळे तुम्हाला आयफोन 11 (iphone 11) ची नक्कीच आठवण येईल. यामध्ये कॅप्सूल टाईप डिजाईनचं वापर केला जाईल. कंपनी कॅमेरा सेंसरला चांगलं करू शकतं. तसच लाईट सेंसरलाही चांगलं बनवेल.

हे ही वाचा >> Crime : कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड! पती, गर्भवती पत्नीसह 8 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, नेमकं कारण काय?

आयफोन 16 सीरिजची किंमत

आयफोन 16 सीरिजचा बेस मॉडेल स्टँडर्ड आयफोन 16 असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याची किंमत जवळपास 79,900 रुपये इतकी असू शकते. परंतु, कंपनीने किमतीबाबत अद्यापही अधिकृत घोषणा केली नाही. याचसोबत आयफोन 15 सीरिजच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळू शकते. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT