Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? 1500 की 2100? मुनगंटीवारांनी थेट सांगितलं

मुंबई तक

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केल्याचं समोर आलंय. लोकसभेत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली.

ADVERTISEMENT

Sudhir Mungantiwar On ladki Bahin Yojana
Sudhir Mungantiwar On ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

point

महिलांना लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपेय कधी मिळणार?

point

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केल्याचं समोर आलंय. लोकसभेत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आलीय. महायुतीला मिळालेल्या बहुमतात लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावलीय. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर महिलांना 1500 रुपयांमध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जातील, असं वचन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. यावर आता भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांन मोठी प्रतिक्रिया दिलीय.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले,  लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये शंभर टक्के वाढ होईल. जर आम्ही 1500 रुपयांचे 2100 केले नाहीत, तर देशातील निवडणुकांमध्ये वेगळा मेसेज जाईल. आम्ही आमचं वचन पूर्ण केलं नाही, अशी चर्चा संपूर्ण देशात सुरु होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आम्हाला हे वचन सत्यात उतरवायचं आहे. आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेला निश्चितपणे पूर्ण करू.

हे ही वाचा >> 3 December 2024 Gold Rate : खुशखबर! लगेच खरेदी करा सोनं, गोल्ड रेटमध्ये पुन्हा घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं. आता ही वाढवलेली रक्कम कधीपर्यंत दिली जाईल, हे सरकारला निश्चित करावं लागेल. जानेवारी की जुलै महिन्यात रक्कम वाढवली जाईल, याबाबत निर्णय घेतला जाईल. आम्ही भाऊबीजेपासून योजनेची सुरुवाती केली होती. 

हे ही वाचा >> Mumbai Weather Update: मुंबईच्या हवामानाने नागरिकांची वाढवली चिंता! आजचं तापमान वाचून हुडहुडीच भरेल

सरकारी तिजोरीवर किती रुपयांचा भार?

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर 45 हजार कोटी रुपयांचा भार आला आहे. जर अतिरिक्त 500 कोटी रुपये दिले, तर सरकारी तिजोरीवर किती भार येईल? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ही रक्कम आमच्याकडून यावर देण्यात येणाऱ्या व्याज्यापेक्षाही कमी आहे. दरवर्षी आम्ही सातव्या वेतन आयोगात जेवढे खर्च करतो, हा खर्च लाडकी बहीण योजनेच्या खर्चापेक्षाही कमी आहे. महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे, मग लोकं असे सवाल उपस्थित का करत आहेत. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp