Mumbai Weather Update: मुंबईच्या हवामानाने नागरिकांची वाढवली चिंता! आजचं तापमान वाचून हुडहुडीच भरेल

मुंबई तक

Mumbai Whether Latest Update : मुंबई शहर आणि उपनगरात मागील आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात 3 डिग्री सेल्सियसने घट झाली आहे

ADVERTISEMENT

Mumbai Todays Whether Update
Mumbai Todays Whether Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई शहर आणि उपनगरात कडाक्याची थंडी!

point

मुंबईत आजचं तापमान काय?

point

हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Wether Latest Update : मुंबई शहर आणि उपनगरात मागील आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात 3 डिग्री सेल्सियसने घट झाली आहे. हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भागात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण परिसरातून येणारी हवा मुंबईच्या तापमानात घट होऊ देत नाही. आठवडाभर अशाप्रकारची स्थिती राहू शकते. अशातच रात्रीचं तापमान, जे काही दिवसांपासून 16 डिग्री सेल्सियसवर होतं, ते तापमान आता 20 ते 21 डिग्री सेल्सियसमध्ये राहणार आहे. 

मुंबईकरांसाठी मागील आठवडा दिलासा देणारा होता. नागरिकांना दिवसा थोडीफार गरमी जाणवत होती, परंतु, रात्री मुंबईकरांना गुलाबी थंडीत हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळालं. मागील आठवड्यात दिवसाचं तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियसमध्ये होतं. तर किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन ते 16.5 आणि 18.8 डिग्री सेल्सियसपर्यंत राहिलं. 

हे ही वाचा >>  Girish Mahajan: फडणवीसांचे संकटमोचक थेट ठाण्यात, म्हणाले 'शिंदे अजिबात रुसले किंवा चिडलेले...'

मुंबईत हलक्या थंडीची चाहूल सुरु झाली असतानाच हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिणपासून मुंबईत येणाऱ्या हवेचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे रविवारच्या रात्रीच्या तापमानात वाढ झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी किमान तापमान 17 डिग्री सेल्सियपर्यंत होतं. शनिवारी हे तापमान 18 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं. तर रविवारी या तापमानात वाढ होऊन ते 20 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं. 

हे ही वाचा >> Markadwadi: निवडणुकीनंतर पुन्हा मतदान, मारकडवाडीचा नेमका प्रकार काय भाऊ?, सगळं समजेल फक्त...

दरम्यान, येणाऱ्या काळाता मुंबई परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. परंतु, पावसाची कोणतीच शक्यता नाही. ढगाळ वातावरण जरी असलं,  कमाल आणि किमान तापमानात कोणताही बदल  होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळाचा तडाखा बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा हवेचा प्रवाह वाढणार आहे आणि तापमानात घट होण्याची शक्यता वाढेल. दक्षिण भागात आलेला फेंगल चक्रीवादळ अरबी समुद्राच्या दिशेन वाटचाल करत आहे. यामुळे हवामानात झालेल्या बदलाचा मुंबईलाही फटका बसला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp