Girish Mahajan: फडणवीसांचे संकटमोचक थेट ठाण्यात, म्हणाले 'शिंदे अजिबात रुसले किंवा चिडलेले...'
भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पाहा ते यावेळी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गिरीश महाजन यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
या भेटीत नेमकं ठरलं तरी काय?
एकनाथ शिंदेंची प्रकृती नेमकी का बिघडली?
ठाणे: देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक अशी ओळख असलेले आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी आज (3 डिसेंबर) थेट ठाणे गाठत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत.
एकनाथ शिंदे हे रुसले, रागावले किंवा चिडलेले नाहीत. त्यांना बरं नसल्याने ते आराम करत आहेत. असं म्हणत गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा शिंदेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या भेटीनंतर गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या सविस्तर.
एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले.
'एकनाथजी यांची तब्बेत खराब होती थ्रोट इन्फेक्शन आहे, ताप देखील आहे. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तीन-चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो. पण ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्यांचा संपर्क झाला नाही.'
'युतीमध्ये सगळं आलबेल आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथजी यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल. त्यानंतर ते बैठक देखील घेतील.आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही.'










