Mazi ladki bahin yojana online form : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज! जाणून घ्या कसं?
Mazi ladki bahin yojana 2024 online apply link nari shakti doot app : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट सरकारने जाहीर केलीये. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीये. पण, अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात... याचबद्दल सर्व माहिती वाचा... (Majhi ladki bahin yojana online apply App Details)
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नारीशक्ती दूत अॅपवरून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
माझी लाडकी बहीण योजनेची सगळी माहिती
माझी लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा?
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra online apply : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, अनेकांना अर्ज कसा भरायचा, याबद्दल माहिती नाहीये. अनेक जण पैसे देताहेत, पण एक रुपयाही खर्च न करता अर्ज कसा करायचा हे समजून घ्या. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents, online apply and pdf form)
Mazi ladki bahin yojana app download : नारीशक्ती दूत अॅप
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अॅप डाऊनलोड करावं लागेल. या अॅपचे नाव आहे नारीशक्ती दूत.
अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. अटी आणि शर्थी वर क्लिक करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
चार अंकी ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो भरा आणि व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक करा.









