HMPV Virus: 'या' देशात 21 वर्षांपूर्वी आढळला HMPV चा पहिला रुग्ण! कोणत्या लोकांना या व्हायरसचा सर्वात जास्त धोका?

HMPV cases in India 2025 : चीननंतर आता भारतातही HMPV (ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसने शिरकाव केला आहे. या नव्या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ADVERTISEMENT

HMPV Cases In India
HMPV Cases In India
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

या लोकांना HMPV व्हायरसचा सर्वात जास्त धोका

point

2001 मध्ये आढळला होता पहिला रुग्ण

point

भारतात 2003 मध्ये आढळला पहिला रुग्ण

HMPV cases in India 2025 : चीननंतर आता भारतातही HMPV (ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसने शिरकाव केला आहे. या नव्या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही लोक या आजाराची तुलना कोविड-19 सोबत करत आहे. परंतु, या आजाराबाबत चिंता करण्याची गरज नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. ही नवीन विषाणू नाहीय. 21 वर्षांपूर्वी भारतात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. दरम्यान, देशभरात हे रुग्ण वाढले असून 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलंय.  बेंगळुरू, नागपूर, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि पश्चिम बंगाल, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. 

HMPV व्हायरस नवीन नाही

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एचएमपीव्ही नवीन व्हायरस नाही. हा व्हायरस भारतात 2001 मध्ये सापडला होता. अनेक वर्षांपासून हा व्हायरस जगभरात शिरकाव करत आहे. एचएमपीव्ही व्हायरस खूप धोकादायक नाहीय. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस म्हणजेच HMPV एक श्वसन व्हायरस आहे. जो माणसाच्या फुफ्फुसात आणि श्वसन नलीकेत इंफेक्शन करतो. हा व्हायरस सामान्यपणे सर्दी किंवा फ्लूसारखी परिस्थिती निर्माण करतो. 

2001 मध्ये आढळला होता पहिला रुग्ण

HMPV एकप्रकारे पॅरामायक्सोव्हायरसचाच एक प्रकार आहे. 2001 मध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. हा व्हायरस रेस्पिरेटरी सिंसिटियल व्हायरस किंवा RSV सोबत जोडला आहे. यासंबंधीत लक्षणेही यात दिसतात.

हे ही वाचा >> 8 January 2025 Gold Rate: नववर्षाच्या सुरुवातीलाच सोन्यानं घातलाय धुमाकूळ, 'या' शहरांतील आजचा रेट वाचून घामच फुटेल

भारतात 2003 मध्ये आढळला पहिला रुग्ण

भारतात या व्हायरसचा पहिला रुग्ण 2003 मध्ये आढळला होता. बीजे मेडिकल कॉलेज आणि एनआयव्ही पुणे यांनी पुण्यात लहान मुलामध्ये व्हायरल आढळल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर या व्हायरसचे अनेक रुग्ण आढळले.2024 मध्ये गोरखपूरमध्ये श्वसनाच्या आजाराने ग्रस्त झालेल्या 100 मुलांपैकी 4 टक्के मुलांमध्ये HMPV ची लक्षणं आढळली होती.डच शास्त्रज्ञांनी वर्ष 2000 मध्ये या व्हायरसबाबत माहिती शोधली होती. या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या जीनोमचं अनुक्रमण 2001 मध्ये केलं गेलं होतं. त्यानंतर त्याच्या सीरोलॉजीकल स्टडीद्वारे माहिती समोर आली की, एचएमपीव्ही 1958 पासूनच नेदरलँडमध्ये आला होता.

हे ही वाचा >> ECI Press Conference : ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतं? 6 वाजेनंतर मतदान कसं वाढतं? निवडणूक आयोगाने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

लहान मुलं आणि वयोवृद्धांना सर्वात जास्त धोका

HMPV मुलं, वृद्ध आणि त्या तरुणांसाठी संवेदनशील होऊ शकतं, ज्यांना अशापक्रारचा आजार झाला असेल आणि त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असेल. निमोनिया किंवा ब्रोंकायटिस एचएमपीव्ही वेगवेगळ्या हंगामात पसरतो. याचा जास्त प्रादुर्भाव हिवाळ्यात होतो. एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्यावर सामान्यपणे खोकला, शिंक, सर्दी किंवा गळा दुखण्यासारखी लक्षणं जाणवतात.