Ladaki Bahin Yojana: महिलांनो! 'ही' माहिती आताच वाचा, नाहीतर लाडक्या बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Ladaki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिलांच्या खात्यात अद्यापही या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. यामागे काही कारण आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेसाठी या महिला पात्र ठरणार नाही, कारण काय?
लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घ्या
लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार?
Ladaki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिलांच्या खात्यात अद्यापही या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. यामागे काही कारण आहेत. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. ( Chief Minister's Ladki Bahin Yojana, the state government has announced to give Rs.1500 per month to women. It is said that so far more than one and a half crore women have benefited from this scheme. The money of this scheme has not yet been deposited in the accounts of some women. There are some reasons behind this)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेसाठी या महिला ठरतील अपात्र
1)ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित (Annual Income) वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल.
2) ज्या कुटुंबातील महिला सदस्य आयकर (Income Tax) भरतात.
3) कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या (Maharashtra Government) स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
5) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनांद्वारे लाभ घेतला असेल.
6) ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
7) ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
8) ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही.
हे ही वाचा >> Sanjay Raut: शिल्पकाराला सुपारी कोणी दिली? शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेमागे ठाणे कनेक्शन?
आधारकार्ड संबंधीत महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे
1) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डसोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे.
2) या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डीबीटी माध्यमाद्वारे आर्थिक सहायत्ता रक्कम पाठवण्यात येईल.
3) लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रक्कमेतून महिला गुंतवणूकही करु शकतात.
4) राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे.
5) आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील.
6) आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही, याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या
हे वाचलं का?
हे ही वाचा >> IMD Todays Rain Update: मुंबईत धो धो कोसळणार? पुढील २४ तासांसाठी पावसाची स्थिती काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलं आहे, त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, हे तपासून पाहावं. जर लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड लिंक नसेल, तर तातडीनं आधार कार्ड लिंक करुन घ्या. कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT