अंघोळीला बाथरूममध्ये गेला आणि परतलाच नाही... विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, पालकांनी थेट तोडफोड...

मुंबई तक

या घटनेनंतर यशच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नातेवाईकांसह संतप्त जमावाने अकॅडमीच्या इमारतीवर हल्ला चढवून काचा फोडल्या आणि फलकांची नासधूस केली. या तोडफोडीच्या लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सांगलीच्या विद्यार्थ्याची कोल्हापुरात आत्महत्या?

point

संतप्त कुटुंबीयांनी अकॅडमीची केली तोडफोड

इचलकरंजी : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यश यादव या बारावीच्या विद्यार्थ्याने इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये मंगळवारी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

या घटनेनंतर यशच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नातेवाईकांसह संतप्त जमावाने अकॅडमीच्या इमारतीवर हल्ला चढवून काचा फोडल्या आणि फलकांची नासधूस केली. या तोडफोडीच्या लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, गावभाग पोलिसांनी 15  जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> गाडीतून सामान उतरवताना भरधाव कारने उडवलं, अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांची नावं समोर

अंघोळीसाठी गेला आणि परतलाच नाही...

यश यादव हा सुतारमळा परिसरातील हॉस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, पण बराच वेळ बाहेर न आल्यानं इतर विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिलं असता, त्याने गळफास घेतल्याचं आढळलं. तातडीने दरवाजा तोडून त्याला खाजगी रुग्णालयात आणि नंतर आयजीएम रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

मृत्यूचं कारण काय? 

यशच्या नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत शवविच्छेदन कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात करण्याची आणि सखोल चौकशीची मागणी केली. त्यानुसार मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

हे वाचलं का?