Leap Year 2024 : 29 फेब्रुवारी ही तारीख चार वर्षांनीच का येते? लीप वर्ष नसते तर...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लीप वर्षाचा इतिहास काय?

point

लीप डे नसता तर काय झालं असतं?

Leap Year 2024 History : दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात लीप वर्ष (Leap Year) साजरं केलं जातं. ज्यावर्षी लीप वर्ष असतं त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात. पण तुम्हाला माहीत आहे का 29 फेब्रुवारी म्हणजेच 'लीप डे'. पण फेब्रुवारीतला हा वाढता दिवस दर चार वर्षांनीच का येतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज याबाबतचा इतिहास आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Leap Year 2024 Why does February 29th date come only after four years If there was no leap year what did

ADVERTISEMENT

लीप वर्षाचा इतिहास काय?

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, दर 4 वर्षांनी 1 अतिरिक्त दिवस जोडला जातो. फेब्रुवारी महिन्यात हा दिवस जोडल्यास हा महिना २८ दिवसांऐवजी २९ दिवसांचा होतो. या अतिरिक्त दिवसाला लीप डे म्हणतात आणि या वर्षाला लीप वर्ष म्हणतात.
 
इसवी सन पूर्व 3000.45 मध्ये रोमन साम्राज्य झाले. त्याचा शासक ज्युलियस सीझरला वाटलं की, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तीन वेगवेगळे ऋतू आहेत हे ओळखण्याची वेळ आली आहे. त्यावर आधारित महिने असावेत. त्यांनी 12 महिने आणि 365 दिवसांचे कॅलेंडर तयार केले. काही दिवस सर्व चांगले गेले, परंतु नंतर त्यांना समजले की पृथ्वीवर 365 ऐवजी 365.24 दिवस आहेत. 

याचाच अर्थ पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला अंदाजे 365.25 दिवस लागतात. त्यानंतर पुन्हा एकदा कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. यावेळी सीझरने मानवनिर्मित आणि सौर कॅलेंडरचे अनुसरण करणारे एक कॅलेंडर तयार केले, ज्यामध्ये दर चार वर्षांनी लीप वर्ष होते. यामुळे, ज्युलियस सीझरला आधुनिक लीप वर्षाचे जनक घोषित करण्यात आले. 

हे वाचलं का?

लीप डे नसता तर काय झालं असतं?

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात लीप डे जोडला नसता तर, अनेक समस्या उद्भवू शकत होत्या. लीप डे महत्वाचा आहे कारण तो कॅलेंडर वर्ष आणि सौर वर्षाशी जुळतो.

कॅलेंडर वर्षानुसार, एक वर्ष 365 दिवसात पूर्ण होतं, तर सौर वर्षानुसार, एक वर्ष 365 दिवस आणि अंदाजे 6 तासांमध्ये पूर्ण होतं.

ADVERTISEMENT

नासाच्या म्हणण्यानुसार, एका वर्षातील 6 तासांचा वेळ फारसा फरक पडत नाही, परंतु वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे हवामान प्रणाली देखील बदलू शकते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी जुलै हा उन्हाळ्याचा महिना असता. लीप वर्ष नसतं तर, शेकडो वर्षात जुलै हिवाळा महिना झाला असता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT