Cold Drink घेतलं की कार्यक्रम झालाच म्हणून समजा, विषय हार्डच...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Cold Drink आहे खूपच हानिकारक (फोटो सौजन्य: Canva)
Cold Drink आहे खूपच हानिकारक (फोटो सौजन्य: Canva)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सॉफ्ट ड्रिंक्स ठरू शकतात हाडांसाठी धोकादायक

point

दररोज सॉफ्ट ड्रिंक्स घेत असाल तर सावधान

point

कॅल्शियमची कमी असेल तर सॉफ्ट ड्रिंक्स घेताना करा विचार

Soft Drinks dangerous to health: मुंबई: हाडं तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो कॅल्शियम. त्यामुळे कुठल्याही कारणाने तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी झालं, तर तुमची हाडं ठिसूळ होणार आणि तुम्हाला हाडांशी संबंधीत आजारही जडणार. याबद्दल तुम्ही ऐकून असालच. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की, सॉफ्ट ड्रिंक्स आणि अन्य काही गोष्टींच्या नियमित सेवनामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी होते. (soft drinks are harmful for bones effects of sugar in carbonated drinks like weight gain heart disease diabetes medical research)

ADVERTISEMENT

पाहा Cold Drink किती करतं तुमचं नुकसान!

दररोजच्या आहारात आपण खात असलेल्या वेगवेगळ्या अन्न पदार्थांमधून आपल्या शरीरात पुरेसं कॅल्शियम जात असतं किंवा ते जाणं अपेक्षित असतं. मात्र, यामध्ये तुम्ही काही ठराविक गोष्टींचा समावेश केल्यामुळे तुमच्या हाडांना त्याचा थेट फटका बसू शकतो. नियमित सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनामुळे हाडं कमजोर होऊ शकतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हे ही वाचा>> Optical Illusion : फोटोत बेडूक दिसतोय? पण तो बेडूक नाही, क्लिक करून नीट बघा

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या सात वर्षांच्या अभ्यासातून असं समोर आलंय की, सॉफ्ट ड्रिंक्सचं जास्त सेवन केल्याने फ्रॅक्चरचा धोका वाढतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील आणखी एक अभ्यासात असं समोर आलंय की, काही सॉफ्ट ड्रिंक्समुळे हाडांच्या घनतेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

हे वाचलं का?

दिल्लीतील आर्टेमिस हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख आणि युनिट हेड डॉ. रामकिंकर झा याबद्दल बोलताना म्हणाले की, “ अनेक कोल्ड ड्रिंक्समध्ये आढळणारे कॅफेन आणि फॉस्फोरिक अॅसिड हे घटक हाडांच्या घनतेवर वाईट परिणाम करू शकतात. कॅफेन हा घटक कॅल्शियम शोषणात अडथळा आणू शकतो. त्यामुळे हाडांना आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची  कमतरता निर्माण होते. तसंच फॉस्फोरिक अॅसिड हे कोल्ड ड्रिंक्समध्ये असतेच. त्यामुळे मुत्रामार्गेही कॅल्शियम जाऊन कॅल्शियमची कमी निर्माण होण्याचा धोका संभवू शकतो. या सर्व गोष्टींच्या परिणामामुळे भविष्यात हाडांना मोठा फटका बसू शकतो."

हे ही वाचा>> Optical illusion IQ Test : चित्रात सुंदर निसर्ग दिसतोय? पण 'तो' निसर्ग नाही, जरा क्लिक करून नीट बघा

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. शिवांगी बोरकर म्हणतात की, “कॅल्शियमसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इनोसिटॉल प्रोटीनला कॅफेन धोका पोहोचवतं. तसंच शरिरातील आतड्यांद्वारे होत असलेल्या कॅल्शियमच्या शोषणातही घट होते. तर सॉफ्ट ड्रिंक्समधील कार्बोनेशन प्रक्रियेमुळे कार्बोनिक ॲसिड तयार होते. ज्यामुळे गॅस्ट्रिक आम्लता बदलते आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होते. तसेच सॉफ्ट ड्रिंक्समधील फॉस्फोरिक अॅसिड आणि एस्पार्टममुळे पीएच कमी होते, ज्यामुळे हाडांचं डिमिनरलायझेशन आणि हाडांची घनता कमी होते.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT