भारतात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला आणणाऱ्या डॉक्टरने स्वत:चंच का संपवलं जीवन?
Architect of India First Test Tube Baby : डॉ. सुभाष मुखर्जी (Dr. Subhash Mukherjee) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि चिकित्सक होते. त्यांना भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे (Test Tube Baby) जनक म्हणून ओळखले जाते.
ADVERTISEMENT

Architect of India First Test Tube Baby : डॉ. सुभाष मुखर्जी (Dr. Subhash Mukherjee) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि चिकित्सक होते. त्यांना भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे (Test Tube Baby) जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे टेस्ट ट्यूब बेबी तयार केले. मुखर्जी यांनी क्रायोबायोलॉजिस्ट सुनीत मुखर्जी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सरोज कांती भट्टाचार्य यांच्या सहकार्याने हा इतिहास रचला होता. (Subhash Mukherjee Who is the Architect of Indias First Test Tube Baby Contribution in ivf Procedure)
ब्रिटीश डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड्स यांच्यानंतर भारतात IVF करणारे मुखर्जी हे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे डॉक्टर ठरले. त्यांच्यामुळे ‘दुर्गा’ (कनुप्रिया अग्रवाल) या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. आजही सुभाष मुखर्जी यांची ही IVF पद्धत बहुतेक प्रकरणांसाठी वापरली जाते.
वाचा : Bihar Politics : शशी थरूर नितीश कुमारांना म्हणाले ‘स्नोलीगस्टर’, लोक शोधताहेत अर्थ?
सुभाष मुखर्जी यांच्याबाबत सविस्तर माहिती
मुखर्जी यांचा जन्म 16 जानेवारी 1931 रोजी बिहारमधील हजारीबाग येथे झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून फिजियोलॉजीमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आणि कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. मुखर्जी यांनी कोलकाता विद्यापीठातून ‘रिप्रॉडक्टिव्ह फिजिओलॉजी’ या विषयात पीएचडी प्राप्त केली.
1967 मध्ये त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून ‘रिप्रोडक्टिव्ह एंडोक्राइनोलॉजी’ या विषयात दुसरी पीएचडी पदवी पूर्ण केली. तर, 1968 ते 1975 या काळात एनआरएस मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे फिजिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.









