रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?

मुंबई तक

विधानसभेत ऑनलाइन रमी खेळणं हे माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलं आहे. कारण आता त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे काढून घेण्यात आलं आहे. त्याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

playing online rummy became expensive finally Manikrao Kokate agriculture portfolio was taken away who is the new agriculture minister
फोटो सौजन्य: Facebook
social share
google news

मुंबई: विधानसभेत रमी खेळणं हे महाराष्ट्रचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंना फार महागात पडलं आहे. कारण याच रमी खेळाची आता त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे.माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांचं कृषी खातं गमवावं लागलं आहे. पण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब अशी ठरली की, त्यांचं मंत्रिपद कायम राहिलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना आता कृषी मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 

माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यापासून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसंच त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी सातत्याने मागणी करत होते. दरम्यान, वाढता दबाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माणिकराव कोकटेंचं कृषी खातं काढून घेतलं आहे. त्याऐवजी त्यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं काहीसं कमी महत्त्वाचं समजलं जाणारं क्रीडा आणि युवक कल्याण हे खातं देण्यात आलं.

हे ही वाचा>> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...

मुंबई Tak च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जाणार आणि त्याऐवजी राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे होणार असं वृत्त मुंबई Tak ने काल (31 जुलै) दुपारच्या सुमारासच दिलं होतं. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण याबाबतची अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये माणिकराव कोकाटेंचं कृषी खात बदलण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. 

माणिकराव कोकाटेंना मिळालं 'हे' खातं, दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री... पाहा 'ती' अधिसूचना जशीच्या तशी

सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई - ४०००३२.

हे वाचलं का?

    follow whatsapp