आयबी अधिकाऱ्याने बहिणीसह विष पिऊन केली आत्महत्या, बंद खोलीत आढळले मृतदेह, सावत्र आईने...
crime news : एका आयबी अधिकाऱ्याने आणि त्याच्या बहिणीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा पोलीस गेली अनेक दिवसांपासून तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आयबी अधिकारी आणि त्याच्या बहिणीची विष पिऊन आत्महत्या

सुसाईड नोटंही सापडेना
crime news : दिल्लीजवळ असणाऱ्या गाझियाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका आयबी अधिकाऱ्याने आणि त्याच्या बहिणीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. 28 वर्षीय अविनाश दिल्लीतील इंटेलिजेंस ब्युरोमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होता. तर त्याची बहीण अंजली एका खासगी कंपनीत कार्यरत होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत या प्रकरणाचा तपास केला. या तपासादरम्यान सुसाईड नोट सापडेल असा पोलिसांचा अंदाज होता, पण तसं काहीही झालं नाही. पोलीस संबंधित प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हेही वाचा : सोलापूरातील नामांकित शाळेत 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पार्किंगमध्येच...नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
दरम्यान, ही घटना गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाणे परिसरातील गोविंदपुरम भागात घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपुरम एच, ब्लॉकमध्ये राहणारे सुखबीर सिंग यांचा 28 वर्षांचा मुलगा अविनाथ कुमार दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या कार्यालयात तैनात होता. अविनाश आणि त्याची 25 वर्षीय बहीण अंजलीने गुरूवारी सायंकाळी विष प्यायलं. त्यानंतर त्या दोघांचीही अचानकपणे एकाच वेळी प्रकृती बिघडल्याने कुटुंबाला धक्काच बसला होता. त्यांनी दोघांनाही कविनगर येथील सर्वोदय रुग्णालयात नेलं, जिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कविनगरचे एसीपी भास्कर वर्मा म्हणाले की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती मिळवली होती. पोलिसांनी तपास केला असता, कसलीही सुसाईड नोट सापडली नाही. यामुळे या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसाठी आणखी अवघड होऊन बसलं होतं. एसपी म्हणतात की, भाऊ-बहिणीने आत्महत्या केली याचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत बाऊ-बहिणीचे वडील सुखबीर सिंह हे देखील एका सरकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची सावत्र आई एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गुरूवारी सायंकाळी त्यांची आई बाहेर गेली असल्याचं चौकशीदरम्यान सांगण्यात आलं होतं.
हेही वाचा : Mumbai Weather: दादरसह 'या' भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार, कोणत्या ठिकाणी पाणी साचणार?
सावत्र आईने सांगितलं, गुरूवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ती पुन्हा परतली नाही, तेव्हा दोन्ही मुले एकाच खोलीत होती. फोन करूनही कसलाही प्रतिसाद दिला नाही. यामुळे तिला काळजी वाटू लागली होती. फोनद्वारे संपर्क केला पण मोबाईल वाजतच नव्हता. आईने नंतर खोलीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला असता, तो आतून बंद होता. त्याच ठिकाणी भाऊ आणि बहीण दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर दोघांनाही एका रुग्णालयात पाठवण्य़ात आले असता, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.
मावशीचा सावत्र आईवर आरोप
दरम्यान, या संबंधित प्रकरणात अविनाशच्या मावशीने मोठा दावा केला आहे. ती म्हणाली की, सावत्र आई ही दोन्ही मुलांना त्रास देत होती. यातूनही त्यांनी आपलं जीवन संपवल्याचा आरोप केला.