कोयता-सत्तुरने हल्ला! व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारला अन् मित्राची बोटंच छाटली... बीडमधील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये एका तरुणाला कोयता आणि सत्तुरने धमकावत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. मात्र, व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाची बोटं छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमधील धक्कादायक प्रकरण

कोयता-सत्तूरने केला मित्रावरच हल्ला

व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारला असता बोटंच छाटली
Beed Crime: बीडमध्ये गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता त्या ठिकाणच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच, बीडमधून अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाला कोयता आणि सत्तुरने धमकावत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. मात्र, व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाची बोटं छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
तीन दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून कोयता आणि सत्तुरने धमकावण्यात आलं. त्यानंतर आरोपींकडून पीडित तरुणाला धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी पीडित तरुणाचा मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित तरुणाने हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब विचारला असता त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञात स्थळी नेत गंभीर पद्धतीने मारहाण केली. या मारहाणीत अनिसचं बोट छाटण्यात आलं.
हे ही वाचा: 6 व्या मजल्यावरुन दिला धक्का; फाटलेले कपडे अन्... प्रेयसीला संपवण्यामागे नेमकं कारण काय?
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन आरोपी पीडित तरुणाला धारदार कोयते आणि सत्तुरने धमकावत असल्याचं दिसत आहे. तसेच, ते तरुणाला शिवीगाळ देखील करत आहेत. "आता तुझ्यावर वार करतो" असे म्हणत ते अनिसवर धावून जातात आणि काही वेळातंच त्याच्यावर वार करतात. हल्ल्यात तरुणाच्या हातावर गंभीर इजा झाली असून अनिसला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे ही वाचा: आयबी अधिकाऱ्याने बहिणीसह विष पिऊन केली आत्महत्या, बंद खोलीत आढळले मृतदेह, सावत्र आईने...
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचं वातावरण पसरलं आहे.