6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्दयी हत्या! दारूच्या नशेत दांडक्याने बेदम मारहाण अन् जागीच...

मुंबई तक

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील मगरासा गावात एक तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला दारुच्या नशेत बेदम मारहाण करत तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्दयी हत्या!
6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्दयी हत्या! (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची केली हत्या

point

दारूच्या नशेत दांडक्याने बेदम मारहाण अन्...

Crime News: उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील मगरासा गावात एक धक्कादायक घडना घडल्याचं समोर आलं आहे. एक तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला दारुच्या नशेत बेदम मारहाण करत तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. 24 वर्षीय पीडित महिला 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगण्यात येत आहे. पतीने दारुच्या नशेत दांडक्याने बेदम मारहाण केल्याने पीडितेचा जागीच मृत्यू झाला. 

दारू पिण्यास विरोध केल्याने मारहाण...

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच मृत पावलेल्या महिलेचं नाव सुमन असून तिच्या पतीचं नाव सोमपाल असल्याची माहिती समोर आली आहे. क्योलडिया मरगापुर गावाचा रहिवासी असलेल्या पूरनलाल यांनी त्यांची मुलगी सुमनचं लग्न मगरासा गावातील सोमपाल नावाच्या तरुणाशी लावून दिलं होतं. सोमपालला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी सुमन त्याला नेहमी दारू पिण्यास विरोध करायची. मात्र, पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्यावर सोमपाल नेहमी तिला मारहाण करायचा. 

हे ही वाचा: सोलापूरातील नामांकित शाळेत 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पार्किंगमध्येच...नेमकं काय घडलं?

6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण 

पीडिता सहा महिन्यांची गर्भवती असून एका महिन्यापूर्वीही सोमपालने त्याच्या पत्नीला अशीच निर्दयी मारहाण केली होती. त्यावेळी आरोपी सोमपालचा भाऊ वहिनीला वाचवण्यासाठी गेला असता त्याचा देखील हात तोडण्यात आला. दरम्यान, सोमपाल आणि त्याचा भाऊ वेगळे राहत असल्याची माहिती आहे. गुरुवारी (31 जुलै) आरोपीने पीडितेला बेदम मारहाण केली. मारहाणीत सुमनचा एक पाय तुटला आणि तिच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यावेळी मारहाणीचा आवाज ऐकून बाजूच्या घरात राहणारी सोमपालची आई कमलेश्वरी सुमनला वाचवण्यासाठी आली, मात्र सोमपालने तिच्या आईला सुद्धा बाथरूममध्ये कोंडून ठेवलं.

पीडितेच्या वडिलांनी केली तक्रार दाखल 

या मारहाणीत सुमनचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी पती पीडितेचा मृतदेह घरातच ठेवून तिथून पळून गेला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि सीओ त्यांच्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी फॉरेन्सिक टीमला सुद्धा तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पीडितेचे वडील पुरनलाल यांनी आरोपी सोमपालविरोधात त्यांच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा: रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?

पोलिसांनी सुमनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमनला अद्याप मुले झाली नव्हती. तसेच, आरोपीला अटक करण्यासाठी छापे टाकले जात असून तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp