Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?
राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चारपैकी दोन शंकराचार्यांनी त्याचे स्वागत केले आहे. परंतु काही कारणास्तव ते अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार की नाही हे आता 22 जानेवरी रोजीच समजणार आहे.
ADVERTISEMENT

Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येत 22 जानेवारी रोजी नव्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे. त्यामुळे अभिषेक सोहळ्याचीही जय्यत तयारी सुरु केली जात आहे. त्यासाठी देशातील अनेक मोठ्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवली जात आहेत. मात्र या निमित्तानं शकराचार्यांची आता चर्चा सुरु करण्यात आली आहे. त्या शंकराचार्यांचीच (Shankaracharya) माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ते कोणत्या मठाचे प्रमुख आहेत, आणि ती पदवी का दिली जाते हे ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आदि शंकराचार्य कोण?
हिंदू धर्मात आदि शंकराचार्य हे हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक नेते होते. त्यांना भगवान शंकराचा अवतारही मानले जात होते. सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी आदि शंकराचार्यांनी भारतातील 4 प्रांतामध्ये चार मठांची स्थापना केली. त्याच चार मठांच्या प्रमुखालाच शंकराचार्य असं म्हटले जाते. ज्या मठासाठी हे पदाचा उगम हा आदि शंकराचार्यांपासून झाला असंही मानलं जातं. या मठांची स्थापना केल्यानंतर आदि शंकराचार्यांनी आपल्या चार मुख्य शिष्यांची त्यांच्यावर नियुक्ती केली गेली. तेव्हापासून या चारही मठांमध्ये शंकराचार्य पदाची परंपरा सुरू करण्यात आली. प्रत्येक मठाचे स्वतःचे खास महावाक्यही असते.
मठ किंवा पीठ म्हणजे काय?
सनातन धर्मात मठ किंवा पीठ म्हणजे अशा संस्था जिथे गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण, उपदेशाच्या गोष्टी दते असतात. त्या ठिकाणी प्रामुख्याने आध्यात्मिक शिक्षणही दिले जाते. ज्या प्रमाणे हिंदू धर्मात याला पीठ किंवा मठ म्हणतात तर बौद्ध धर्मातील मठांना विहार म्हणतात. ख्रिश्चन धर्मात त्यांना मठ, प्रायरी, चार्टरहाऊस नावांनी ओळखले जाते. अशा प्रकारे आपल्या देशातील द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि शृंगेरी पीठ हे चार प्रमुख मठ असून तिथे हिंदू धर्मातील शिक्षण आणि उपदेश दिले जाते.
विद्वत परिषदेची मान्यता
देशातील या चार पीठांवर शंकराचार्यांच्या नियुक्तीसाठी त्यागी, दंडी संन्यासी, संस्कृत, चतुर्वेद, वेदांत ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी वैयक्तिक आयुष्यात मुंडन, पिंड दान आणि रुद्राक्ष धारण करणे हे ही महत्त्वाचे मानले जाते. शंकराचार्य होण्यासाठी चार वेद आणि सहा वेदांग जाणणारा ब्राह्मण असणे महत्वाचे असल्याचे सांगितले जाते. ज्यांना शंकराचार्य बनवले जाते, त्यांना आखाड्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर, प्रख्यात संतांची संमती आणि काशी विद्वत परिषदेच्या मान्यतेचा शिक्काही लागतो. यानंतरच शंकराचार्य ही पदवी दिली जाते.