लाइव्ह

MLA Disqualification Case : “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”

योगेश पांडे

ADVERTISEMENT

shiv sena mlas disqualification case live : uday samant, leader of shinde faction cross examination by thackeray faction lawyer devadatt kamat.
shiv sena mlas disqualification case live : uday samant, leader of shinde faction cross examination by thackeray faction lawyer devadatt kamat.
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:20 PM • 11 Dec 2023

    माहिती दिशाभूल करणारी... सामंतांना ठाकरेंच्या वकिलांनी काय विचारलं?

    देवदत्त कामत - आपण आपल्या शपथपत्रात Para 1 ते 29 मध्ये जी माहिती उत्तर रुपात दिली आहे ती चूक आणि मिस गाईड करणारी आहे हे असे दिसून येत आहे हे बरोबर आहे का?उदय सामंत - हे चूक आहे.
  • 05:13 PM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदे २००४ पासून नेते होते असे कसे काय म्हणू शकता?

    देवदत्त कामत - प्रश्न क्रमांक 66 च्या उत्तरात आपण म्हटलं आहे की आपल्याला 2012 पूर्वी शिवसेनेतील नेतेपदाची काय परिस्थिती होती याची कल्पना नाही, तर प्रश्न क्रमांक 59 च्या उत्तरात आपण एकनाथ शिंदे हे 2004 पासून शिवसेनेचे नेते होते असं आपण कसं काय म्हणू शकता?उदय सामंत - विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर विधानसभेतील सहकाऱ्यांबरोबर चर्चा करताना ही माहिती मला मिळाली.देवदत्त कामत - वरील प्रश्नाच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर बोलताना मिळाली, असे आपण म्हणता. तर ही माहिती इतर सहकाऱ्यांशी बोलताना मिळाली आहे की ऑफिशियल डॉक्युमेंटवर आधारित आहे? चूक की बरोबर?उदय सामंत - होय. त्यावेळी असू शकेल कारण मी एनसीपी मध्ये होतो.
  • 05:08 PM • 11 Dec 2023

    पक्षप्रमुख हा शब्द कुठून घेतला? ठाकरेंच्या वकिलांचा शिंदेंच्या आमदाराला सवाल

    देवदत्त कामत - आपल्या प्रश्न क्रमांक 56 मधील उत्तर मध्ये म्हटल्यानुसार आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून संबोधत होतो. आपण पक्षप्रमुख हा शब्द कुठून घेतला?उदय सामंत - काही नेते मंडळींची तशी इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे हे शिवसेना राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून सर्व संमतीने निवडून आले होते, तेही बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सन 2012 मध्ये. हे चूक की बरोबर?उदय सामंत - याबद्दल मला माहिती नाही. मी 2012 मध्ये शिवसेनेत नव्हतो.देवदत्त कामत - आपल्यासमोर मुख्य निवडणूक आयोगांना दिलेले पत्र आहे. त्या पत्राच्या दुसऱ्या परिच्छेदात असे म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख या पदासाठी केवळ एकच फॉर्म प्राप्त झाला होता आणि परिच्छेद तीन मध्ये असं म्हटलं आहे की, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. कारण जेवढी पदांची संख्या होती तेवढेच फॉर्म प्राप्त झाले होते. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला असे म्हणायचे आहे का की, उद्धव ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी सन 2013 साली प्रथम एक मताने निवडून आले होते. आपल्याला याबद्दल काय म्हणायचे आहे?उदय सामंत - त्याबाबत मला काही माहिती नाही.
  • 04:34 PM • 11 Dec 2023

    कोणत्या काळात शिवसेनेचे आमदार-खासदार शिंदेंकडे गाऱ्हाणे मांडायचे? कामतांचा सवाल

    देवदत्त कामत - वरील प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटलं की पक्षाचे लोकप्रतिनिधी शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडत होते, अस म्हणता, तर आपण कुठल्या काळाचा संदर्भ देत आहात?उदय सामंत - काळ मोठा होता, पण स्पेसिफिक मला आता आठवत नाही. मला आठवत नाही.
  • ADVERTISEMENT

  • 04:30 PM • 11 Dec 2023

    हे चुकीचे आहे, कामतांच्या प्रश्नावर सामंतांचा खुलासा

    देवदत्त कामत - Majority of organization, who are also public representative have unanimously extended support to shinde is absolutely false and baseless, is it correct? (संघटनेतील बहुसंख्य, जे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी एकमताने शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा खोटा आणि निराधार आहे, हे बरोबर आहे का?)उदय सामंत - हे चुकीचे आहे. या प्रश्नाचे अनुषंगाने मला एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती सांगितली पाहिजे की, 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्षप्रमुख हे पद नसताना देखील वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून आणि आम्हाला सर्वांना आधार होता म्हणून पक्षाप्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडायचे आणि त्यांना शिवसेना नेते म्हणून शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.
  • 04:29 PM • 11 Dec 2023

    आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली होती -उदय सामंत

    देवदत्त कामत - तुम्ही किंवा अन्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत गठबंधन तोडण्यासाठी विनंती केलेली नव्हती, हे चूक की बरोबर?उदय सामंत - ते चुकीचे आहे, आम्ही विनंती केलेली होती.
  • ADVERTISEMENT

  • 04:18 PM • 11 Dec 2023

    आपण अपात्रतेेची कारवाई ओढवून घेतली आहे -देवदत्त कामत

    देवदत्त कामत - मी आपल्याला असे म्हणू शकतो का की, 2 जुलै 2022 रोजी विश्वासदर्शक प्रस्तावा दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करून सुनील प्रभू यांच्याद्वारे पाठवलेल्या पक्षादेशाचं आपण उल्लंघन केलं आहे आणि आपण अपात्रतेची कारवाई आपल्यावर ओढवून घेतली आहे.उदय सामंत - खोटे आहे. चुकीचे आहे.
  • 04:17 PM • 11 Dec 2023

    होय, मी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजून मतदान केले -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपल्याला सुनील प्रभू यांचा दिनांक 2 जुलै 2022 रोजी जारी केलेला पक्षादेश मिळाला होता म्हणून आपण हे चुकीचे साक्ष देत आहात, असं मला म्हणायचं आहे. हे चूक की बरोबर?उदय सामंत - चूक.देवदत्त कामत - 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तुम्ही एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले होते काय?उदय सामंत -होय.
  • 04:15 PM • 11 Dec 2023

    मी राहुल नार्वेकरांना मतदान केले -उदय सामंत

    देवदत्त - 3 जुलै 2022 च्या विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यात आपण भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते का?उदय सामंत - अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये माझ्या सद्सद् विवेकबुद्धीप्रमाणे मी राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते, कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज ते योग्य तऱ्हेने चालवतील अशी खात्री होती.देवदत्त कामत - तीन जुलै 2022 रोजी च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना या राजकीय पक्षाकडून पक्षादेश जारी करण्यात आला होता, असं आपल्याला म्हणायचं आहे का?उदय सामंत - मी मागील उत्तरांमध्ये देखील असे सांगितले आहे की, मला जी माहिती आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीपची आवश्यकता नाही. म्हणून मी माझी सद्सद् बुद्धी जागृत ठेवून योग्य त्या व्यक्तीस मतदान केले आणि त्यावेळी देखील व्हीप मिळालेला नव्हता.देवदत्त कामत - विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षाने कोणताही पक्षादेश जारी केला नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का ?उदय सामंत - मला मिळालेला नाही, बाकी मला माहिती नाही.
  • 04:14 PM • 11 Dec 2023

    व्हीपवरून उदय सामंतांना सवाल

    देवदत्त कामत - mlaoffice99@gmail.com हा आपला ईमेल ऍड्रेस आहे, हे बरोबर आहे का?उदय सामंत - हो, बरोबर आहे.देवदत्त कामत - 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी जारी केलेले दोन पक्षादेश तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून वरील ईमेल आयडीवर विजय जोशी यांच्याकडून प्राप्त झाले होते, हे खरे आहे का?उदय सामंत - हे चुकीचे आहे. माझ्या ईमेल आयडीवर मला कुठलाही व्हीप मिळालेला नाही.देवदत्त कामत - राजन साळवी हे सन 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते, याची आपल्याला कल्पना आहे का?उदय सामंत - होय.
  • 04:02 PM • 11 Dec 2023

    मी बैठकीला उपस्थित नव्हतो -उदय सामंत

    देवदत्त कामत - हे खरे आहे काय की, 22 जुलै 2022 रोजीच्या बैठकीत आपण उशिरा पोहोचल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यानी त्याची फोटोकॉपी काढली?उदय सामंत - हे चुकीचे आहे. दिनांक 22 जून 2022 रोजीच्या बैठकीस मी उपस्थित नव्हतो.
  • 03:51 PM • 11 Dec 2023

    उदय सामंत म्हणाले, मी सहमत नाही

    देवदत्त कामत - मी आपल्याला असे म्हणू शकतो की, आपण 21 जून 2022 रोजीच्या बैठकीच्या उपस्थिती पत्रावर जी स्वाक्षरी आहे, ती आपली नाही असे म्हटलेले आहे. खरंतर आपल्याला हे नंतर सुचलेले आहे, त्यामुळे ही आपली चूक नाही का?उदय सामंत- मी सहमत नाही.
  • 03:49 PM • 11 Dec 2023

    सहीचा मुद्दा ठाकरेंच्या वकिलांनी सामंतांना पकडलं खिंडीत

    देवदत्त कामत - आपण म्हटल्याप्रमाणे याचिकेला आपलं उत्तर मसुदा तयार होत असताना आपल्या वकिलाने आता आपण जे डॉक्युमेंट बघितलं त्याची आपल्याला कल्पना दिली होती. मग असं असूनही आपल्या संपूर्ण उत्तरांमध्ये या पी 2 वर स्वाक्षरी आपली नसल्याचा इन्कार कुठे केला नाही, असं का?उदय सामंत - याचे उत्तर मी अगोदरच दिलेले आहे. कारण सहीच्या बाबतीतील कागदांवर मी सही केलेली नाही, या बाबीवर मी ठाम आहे.
  • 03:47 PM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपण पूर्वी कोणत्या दिवशी हा कागद बघितला आहे का?उदय सामंत - नाही.देवदत्त कामत - अपात्रता याचिकेला ऑगस्ट 2023 मध्ये उत्तर देताना 24 नोव्हेंबर 2023 रोजी हे शपथपत्र सादर केले आहे. आपल्याला या डॉक्युमेंटची कल्पना नव्हती असं म्हणायचं आहे का?उदय सामंत - हे डॉक्युमेंट जरी आता पाहिले असले, तरी माझ्या वकिलांनी रिप्लाय करताना मला ब्रीफ केले होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 21 तारखेच्या बैठकीनंतर ज्यावेळी मी माझ्या शासकीय निवासस्थानी आलो. त्यावेळी मी देखील सोशल मीडियावर आणि टीव्हीवर असं पाहिलं की, मी कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्हीप वर सही न करता देखील त्यावेळी माझ्या नावाचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना हटवण्याची कारवाई करण्यात आली होती.
  • 03:44 PM • 11 Dec 2023

    ठाकरेंच्या वकिलांचा सहीवरून उलट सवाल

    देवदत्त कामत - मागील प्रश्न क्रमांक 36 ला आपण जे उत्तर दिले. त्यानुसार आपण सहपत्र P-2 अपात्रता पीटिशन क्रमांक 19/2022 ही आजच्या आधी कधी पाहिलेली नव्हती, असा याचा अर्थ घायचा का ?उदय सामंत - मी मागील उत्तरामध्ये असे म्हणालो आहे की, माझ्या हातामध्ये जे सह्याचे कागद देण्यात आले, त्यावरील सही माझी नाही.
  • 03:42 PM • 11 Dec 2023

    ती स्वाक्षरी माझी नाही - उदय सामंत

    देवदत्त कामत - पेज 9 वर ज्या 24 स्वाक्षऱ्या आहे त्यापैकी एक आपली आहे का ?उदय सामंत - नाहीदेवदत्त कामत - या डॉक्युमेंटमध्ये एकूण 24 स्वाक्षऱ्या आहेत, हे खरे आहे काय?उदय सामंत - आता जो कागद माझ्या हातात दिलेला आहे, त्यावरील सह्या मोजल्या असता त्या 24 आहेत, परंतु त्यामध्ये माझी सही नाही.
  • 10:57 AM • 11 Dec 2023

    व्हीपवरून ठाकरेंच्या वकिलाचा उलट सवाल

    देवदत्त कामत - शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे पक्षादेश 21 जून 2022 रोजीचा प्राप्त झाल्यांनातर तुम्ही व्हीप मिळाल्याची पोच पावती दिली होती का?उदय सामंत - मी सुरुवातीला सांगितले की आहे की, ही सही माझी नाही. हा व्हीप मी स्वीकारलेला नव्हता, परंतु माझ्या मर्यादित माहितीनुसार सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी व्हीप असतो. आता माझ्या हातात जो कागद ठेवलेला आहे, त्यावरून मला असे वाटत आहे की, हा व्हीप नसून ते पत्र आहे. त्यावर असलेली सही माझी नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा प्रश्न नाही. असा कागद निमंत्रण किंवा पत्र खासगी कार्यक्रमाचे देखील निघू शकते.
  • 10:53 AM • 11 Dec 2023

    मला कोणताच व्हीप मिळाला नाही - उदय सामंत

    देवदत्त कामत - 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील बैठकीत उपस्थित होतात. 21 जून 2022 रोजीच्या सुनील प्रभू यांचा पक्ष आदेश आपल्याला प्राप्त झाला होता म्हणून आपण उपस्थित होते का?उदय सामंत - 21 जून रोजी माझे विधिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि मला निमंत्रण दिले. परंतु ही बैठक कशा संदर्भात आहे हे मला सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो परंतु त्या दिवशी किंवा त्यानंतर कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही आणि कोणतीही सही कोणत्याही कागदावर केलेली नाही. सुनील प्रभू यांच्या द्वारा कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही.
  • 10:48 AM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंना खासदार-आमदारांचा पाठिंबा होता -उदय सामंत

    देवदत्त कामत - पक्षाच्या बहुतांश पक्ष संघटनेने ज्यामध्ये जनप्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे यांना एकमताने पाठिंबा दर्शवला होता का? निवडून आलेले लोकप्रतिनिधी, असे आपल्याला म्हणायचं आहे का?उदय सामंत - निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील.
  • 10:44 AM • 11 Dec 2023

    एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना बोलले पण उपयोग झाला नाही -उदय सामंत

    देवदत्त कामत - वरच्या प्रश्न क्रमांक 24 मध्ये म्हटल्यानुसार आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करण्याबाबत भेटणार असं म्हटलं होतं. ही विनंती आपण एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून का नाही केली?उदय सामंत - मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती केली होती आणि आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे सांगितले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
  • 10:36 AM • 11 Dec 2023

    उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले म्हणून मंत्री झालो -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज होते का?उदय सामंत - ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की, जी निवडणूक आपण नॅचरल अलायन्समध्ये लढलो, भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल, अशी आमची समजूत काढल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो होतो. पुन्हा काही कालावधीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणून मी मंत्रिमंडळ सामील झालो.
  • 10:34 AM • 11 Dec 2023

    महाविकास आघाडीबद्दल नाराज होतो -उदय सामंत

    देवदत्त कामत - विधिमंडळ पक्षाचे कार्य कसे चालावे, याबाबत घटनेमध्ये काही उल्लेख नाही असे आपण पॅरा 9 मध्ये म्हटले आहे असे का म्हंटल आहे?उदय सामंत - मी मघा उल्लेख केला की, 1999 मध्ये अमेंडमेंट झालेली जी घटना आहे, त्याचा मला पूर्ण अभ्यास नाही परंतु त्यातून मी जे काही वाचू शकलो व त्यातून मला जे काही समजले त्या आधारावर मी असे म्हटले आहे.देवदत्त कामत - हे खरे आहे का की, पॅरा 10 आणि 11 मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही महाविकास आघाडी (शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी ) बाबत नाराज झाले होते?उदय सामंत - होय, मी नाराज होतो.
  • 10:32 AM • 11 Dec 2023

    शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा होता - उदय सामंत

    देवदत्त कामत - आपण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याची जी भूमिका घेतली होती, त्याला आपण पाठिंबा दिला होता का?उदय सामंत- पाठिंबा नक्कीच दिला होता आणि ती तारीख देखील रेकॉर्डवर आहे.देवदत्त कामत - तुम्ही जून 2022 मध्ये गुवाहाटीला कोणत्या तारखेला प्रस्थान केले.उदय सामंत - मला निश्चित आठवत नाही, परंतु 24 किंवा 25 जून 2022 ला गेलो असेन.
  • 10:28 AM • 11 Dec 2023

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : उदय सामंत उलटतपासणी

    देवदत्त कामत - पॅरा 6 मध्ये असा उल्लेख आहे की, 31 ऑक्टोबर 2019 रोजी एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले होते. पक्षाचे नेते म्हणून झालेले नव्हते हे चूक की बरोबर?उदय सामंत - मी याचे उत्तर मघाशीच दिले आहे की आमदारांच्या बैठकीमध्ये हा ठराव झाला होता आणि एकनाथ शिंदे यांना गटनेते हे आमदारांच्या बैठकीमध्ये एकमताने आणि संमतीने ठरवण्यात आले होते.
  • 10:26 AM • 11 Dec 2023

    Shiv Sena Mla Disqualification Live : उदय सामंत यांची उलटतपासणी

    देवदत्त कामत - 31 .10.2019 चा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पॉलिटिकल पार्टी म्हणून निर्णय घेतले होते, हे खरे आहे का?उदय सामंत - मी मघाशी देखील सांगितले की, आमदारांच्या सहमतीने आणि ठरावाने ते निर्णय झालेले होते.
  • 10:17 AM • 11 Dec 2023

    ...तोपर्यंत उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते -उदय सामंत

    देवदत्त कामत - आपण आपल्या प्रश्न क्रमांक 11 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आपण या बैठकांमध्ये उपस्थित राहिल्याचा उल्लेख केला आहे. या बैठका कधी आणि कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या ?उदय सामंत - याला काही विशिष्ट काळ नव्हता. या बैठका, सभा असायच्या.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नवनियुक्त आमदारांची बैठक घेतली होती, हे खरे आहे का?उदय सामंत - ही जी बैठक आपण सांगत आहात, त्याचे नक्कीच उद्धवजी अध्यक्ष होते. परंतु त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असल्यामुळे सर्व आमदारांनी तो निर्णय घेतला होता.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नवनियुक्त आमदारांची बैठक घेतली होती, हे खरे आहे का? त्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांनी घेतले का?उदय सामंत - ज्या बैठकीत निर्णय झाले, त्या बैठकीचे अध्यक्ष जरी उद्धव ठाकरे असले, तरी देखील आमदारांच्या एकमताच्या ठरावाने ते निर्णय झाले. ते केवळ जाहीर उद्धवजी यांनी केले.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते आणि त्यांनी पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेतले होते, या मताशी आपण सहमत आहे का?उदय सामंत - या मताशी मी सहमत नाही. कारण त्यावेळी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आमदारांच्या ठरावाने झाल्या होत्या.देवदत्त कामत - हे खरे आहे का की, उद्धव ठाकरे हे 31 ऑक्टोबर 2019 रोजी पक्षप्रमुख होते?उदय सामंत - होय.देवदत्त कामत - उद्धव ठाकरे हे या अपात्रता याचिका जून /जुलै 2022 मध्ये दाखल करेपर्यंत पक्षप्रमुखपदी आणि पक्षाचे अध्यक्षपदी कायम होते, हे म्हणणे बरोबर आहे का?उदय सामंत - मला असे वाटते की, या ज्या जून आणि जुलै 2022 मधील तारखा आहे, त्याच्या काही कालावधी अगोदर पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झालेले होते, ती देखील पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.देवदत्त पुन्हा एकदा प्रश्न- उद्धव ठाकरे हे या अपात्रता याचिका जून /जुलै 2022 मध्ये दाखल करेपर्यंत पक्षाप्रमुख पदी आणि पक्षाचे अध्यक्षपदी कायम होते, हे म्हणणे बरोबर आहे का, होय की नाही स्पेसिफिक सांगा?उदय सामंत - ते प्रक्षप्रमुख होते हे काही नाकारता येणार नाही, परंतु पक्षांतर्गत जे विशिष्ट मतभेद झाले. त्याचबरोबर या पिटीशन चालू आहेत व त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिले आहे.
  • 10:11 AM • 11 Dec 2023

    शिवसेना घटनेनुसार चालते का? उदय सामंत म्हणाले...

    देवदत्त कामत - 2019 विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आल्यानुसार पक्षाचे महासचिव आणि सचिव अनुक्रमे सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी आपल्या ए आणि बी फार्मवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या हे चूक की बरोबर?उदय सामंत - याचे उत्तर मी सुरुवातीलाच दिले आहे की, त्यावर सही कोणाची होती हे मला माहिती नाही.देवदत्त कामत - शिवसेना राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आपल्या पक्षातील नेते पदाची रचना कळवत असतो का? आणि हीच रचना निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे का?उदय सामंत - शिवसेनेच्या घटनेबाबत माझा पूर्णतः अभ्यास नाही, परंतु 1999 ची घटनादुरुस्ती ही वेबसाईटवर आहे. त्यानुसारच पक्ष चालतो, अशी माझी धारणा आहे.देवदत्त कामत - शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षाचे नेते कोण, त्या व्यक्तींची नावे वेळोवेळी नमूद केली आहेत का?उदय सामंत - याबाबत मला काहीच कल्पना नाही. परंतु शिवसेनेचे नेते मनोहर जोशी हे आज यात नाहीत. ते सुधीर जोशी, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ , एकनाथ शिंदे आणि अन्य आहेत हे मला बैठकीला असताना समजायचे.
  • 10:07 AM • 11 Dec 2023

    उदय सामंतांना ए,बी फॉर्मवरून प्रश्न

    देवदत्त कामत - आपल्या शपथपत्रामधील पॅरा 2 मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे शिवसेना पक्ष आणि भाजप सन 1999 ते सन 2019 पर्यंत नैसर्गिक युतीत होता. ही बाब सत्य नाही याबाबत आपले काय म्हणणे आहे?उदय सामंत - नक्कीच ही नैसर्गिकच युती होती. कारण 2019 मध्ये देखील नैसर्गिक युतीने भाजप शिवसेना हे युती म्हणून लढले होते. ज्यावेळी आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळी नक्की तसे का लढलो याची मला कल्पना नाही.देवदत्त कामत - आपण राष्ट्रवादीमध्ये असताना आपल्या उमेदवारीच्या AB फॉर्म वर कोणाची सही होती?उदय सामंत - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा अन्य ज्यावेळी मी निवडणूक लढलो, त्यावेळी पार्टीवर विश्वास ठेवून मी एबी फॉर्म घ्यायचो. त्यामुळे सही बघण्याचा प्रश्न कधी आला नाही.देवदत्त कामत - प्रश्न क्रमांक सहाच्या उत्तरात आपण म्हटलं आहे की, पक्षावर विश्वास ठेवून आपण एबी फॉर्म घेत होता, असे म्हणणे खरे राहील का की, पक्ष नेतृत्व एबी फॉर्म देत होता हे म्हणणे खरे राहील?उदय सामंत - ज्या पक्षामधून मी निवडणूक लढलो होतो, त्यावेळी आम्ही कधीच अभ्यास केला नाही की, एबी फॉर्म कोण देत?देवदत्त कामत - आपल्या मते राजकीय पक्षातील कोणीही नेता ए किंवा बी फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो का? किंवा ज्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता आहे, त्या पक्षाचे नेतृत्व हे फॉर्म देऊ शकते?उदय सामंत- याबाबत मी अभ्यास केलेला नसल्यामुळे याबाबत मला माहिती नाही.
  • 10:03 AM • 11 Dec 2023

    उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात

    देवदत्त कामत- तुम्ही शिवसेना कधी जॉईन केली?उदय सामंत- मी 2014 मध्ये शिवसेना पक्ष जॉईन केला.देवदत्त कामत- शिवसेनेत प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात होतात?उदय सामंत- राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ( एनसीपी).देवदत्त कामत- आपण किती वेळा महाराष्ट्रात आमदार राहिलात आणि कोणत्या पक्षातून?उदय सामंत- मी चार वेळा विधानसभा सदस्य राहिलो आहे. 2 वेळा एनसीपी आणि 2 वेळा शिवसेना.देवदत्त कामत - हे खरे आहे का की, 2014 विधानसभामध्ये तुम्ही भाजप विरोधात लढले?उदय सामंत- हो खरे आहे, कारण सर्वच पक्ष स्वबळावर लढत होते त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत होते.
follow whatsapp

ADVERTISEMENT