Pragya Thakur : "मोदींना माझे काही शब्द...', तिकीट कापल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचं मोठं विधान

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भोपाळमधून तिकीट नाकारल्यानंतर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.
BJP MP Pragya Thakur said after being denied ticket from Bhopal
social share
google news

News about Pragya Singh Thakur :  195 लोकसभा मतदारसंघांसाठीचे उमेदवार जाहीर करताना भाजपने अनेक विद्यमान खासदारांना डच्चू दिला. यात एक नाव आहे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं. तिकीट कापण्यात आल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. (BJP MP Pragya Thakur First Reaction after being denied ticket from Bhopal lok sabah)

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे पक्षाने कापली आहेत. तुमचे तिकीट का कापण्यात आले, असा प्रश्न जेव्हा प्रज्ञा ठाकूर यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मोदींचं नाव घेत उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, "कदाचित मी काही शब्द वापरले आहेत, जे मोदीजींना आवडले नाहीत."

भाजपने शनिवारी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. आलोक शर्मा यांना प्रज्ञा ठाकूर खासदार असलेल्या भोपाळमधून तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने मध्य प्रदेशातील 29 पैकी 24 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भोपाळमधील प्रज्ञा ठाकूर आणि गुना येथील केपी शर्मा या राज्यातील दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले असून, त्यांच्या जागी ज्योतिरादित्य शिंदे निवडणूक लढवणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'यापूर्वीही तिकीट मागितले नव्हते, आताही मागत नाही'

प्रज्ञा ठाकूर यांना जेव्हा विचारण्यात आले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना तिकीट का दिले नाही? त्या म्हणाल्या, "हा पक्ष संघटनेचा निर्णय आहे, तिकीट का कापले, कसे कापले याचा विचार करू नये. मी आधी तिकीट मागितले नव्हते आणि आताही मागितले नाही."

हेही वाचा >> "राजकारण सोडेन, पण...", शिंदेच्या नेत्याने वाढवले राणा-भाजपचे टेन्शन!

मोदी म्हणाले होते, "प्रज्ञा ठाकूरला माफ करू शकणार नाही"

प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पंतप्रधान मोदी एकदा संतापले होते. प्रज्ञा ठाकूर यांनी एकदा महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे 'खरा देशभक्त' असे गौरवोद्गार काढले होते. त्यावर बोलताना मोदी म्हणाले होते की, "मी त्यांना माफ करू शकणार नाही. गोडसेच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागितली आहे, पण महात्मा गांधींचा अपमान केल्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांना मी कधीही माफ करू शकणार नाही", असे ते म्हणाले होते.

ADVERTISEMENT

"मोदीजींना माझे काही शब्द आवडले नाहीत"

भाजपच्या विद्यमान खासदार म्हणाल्या, "मी कदाचित काही शब्द वापरले जे मोदीजींना आवडले नाहीत आणि ते म्हणाले होते की ते मला माफ करणार नाहीत, परंतु मी त्याबद्दल आधीच माफी मागितली आहे. माझे खरे बोलणे. यामुळे विरोधक आणि काँग्रेसचे लोक चिडतात आणि माझ्या आडून ते मोदींवर हल्ला करतात", असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. 

ADVERTISEMENT

"मी जे काही बोललो ते सत्य होतं"

प्रज्ञा ठाकूर यांनी आजही गोडसेच्या विधानाला सार्थ ठरवले. मी जे काही बोलले ते सत्य असल्याचे सांगितले त्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. "मीडियाने याला वादग्रस्त विधान म्हणत या प्रकरणाला खतपाणी घातले", असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> ओवेसींविरोधात भाजपने शोधला नवा चेहरा, कोण आहेत डॉ. लता? 

तिकीट न दिल्याने पक्ष सोडण्याचा विचार केला आहे का, या प्रश्नावर प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, "पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. संघटना माझ्यावर जी जबाबदारी देईल ती मी पूर्ण करेन आणि जिथे गरज असेल तिथे मी उपलब्ध असेल."

    follow whatsapp

    ADVERTISEMENT