Lok Sabha 2024: BJP च्या 195 उमेदवारांची संपूर्ण यादी, महाराष्ट्रातील केवळ एका नेत्याचा समावेश

रोहित गोळे

ADVERTISEMENT

भाजपची लोकसभा निवडणुकीची संपूर्ण पहिली यादी
भाजपची लोकसभा निवडणुकीची संपूर्ण पहिली यादी
social share
google news

BJP 1st list Lok Sabha election 2024: नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदींसह 34 केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. (lok sabha election 2024 bjp complete 1st list of 195 candidates including only one leader from maharashtra kripashankar singh)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा जागांसाठीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. जी आम्ही आज जाहीर करत आहोत. विनोद तावडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत.

याशिवाय पक्षाने 34 मंत्री आणि 3 माजी मुख्यमंत्र्यांनाही उमेदवारी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच जम्मू-काश्मीरच्या 5, उत्तराखंडच्या 3, अरुणाचलच्या 2, गोव्याच्या 1, त्रिपुराच्या 1, अंदमानच्या 1, दमण आणि दीवच्या 1 जागेसाठी देखील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शहा गांधीनगरमधून, मनसुख मांडविया पोरबंदरमधून, राजनाथ सिंह लखनऊमधून, जितेंद्र सिंह उधमपूरमधून, किरेन रिजिजू अरुणाचल पूर्वमधून, स्मृती इराणी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील नेते कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी

भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात दिल्ली मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या 195 उमेदवारांची नावं जाहीर केली. पण त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, असं असलं तरीही ज्यांनी महाराष्ट्रातच आपलं राजकीय करिअर घडवलं त्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आहे.

ADVERTISEMENT

शिवराज चौहान विदिशामधून लोकसभा निवडणूक लढवणार

मध्य प्रदेशात भाजपने माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहा भाजपच्या 195 उमेदवारांची संपूर्ण यादी

1. 

 

2. 

3. 

 

4. 

 

5. 

 

6. 

 

7. 

8. 

 

9. 

 

10. 

 

11. 

12. 

 

13. 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT