BJP List : पहिल्या यादीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं वाढवलं टेन्शन, कारण...
BJP list of candidates for lok sabha election 2024 : भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर

भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना दिला धक्का

भाजपकडून काही केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता
BJP candidate list Lok Sabha 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (2 मार्च) जाहीर केली. पण, या यादीमुळे महाराष्ट्रातील भाजपतून इच्छुक असलेल्याचं आणि विद्ममान खासदारांचं टेन्शन वाढलं आहे. ते कसं हेच जाणून घ्या.
तत्पूर्वी समजून घेऊयात उमेदवारांच्या यादीबद्दल महत्त्वाच्या गोष्टी भाजपने पहिली यादी जाहीर केली, या यादीत 34 मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे, ज्यांना पक्षाने लोकसभा 2024 निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक वाराणसी मतदारसंघातून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊ मतदारसंघातून लढणार आहेत.
तर याशिवाय भाजपने तीन माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सर्बानंद सोनोवाल आणि बिप्लब कुमार देब यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. शिवराज सिंह मध्य प्रदेशातील विदिशा, सोनोवाल आसाममधील दिब्रुगडमधून आणि देब पश्चिम त्रिपुरामधून निवडणूक लढवणार आहेत.
हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, रमेश बिधुरी यांचा पत्ता कट
भाजपने अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत. यामध्ये माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला यांच्याशिवाय रमेश बिधुरी, साध्वी प्रज्ञा, केपी यादव आदींच्या नावांचा समावेश आहे. हर्षवर्धन हे राजधानी दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.