VBA: 'मनोज जरांगेंना उमेदवारी द्या', वंचितची सर्वात मोठी मागणी.. जरांगेंचंही सूचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी द्या, वंचितचा प्रस्ताव
मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी द्या, वंचितचा प्रस्ताव
social share
google news

VBA Demand for Manoj Jarange: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईत आज (28 फेब्रुवारी) एक बैठक घेतली. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील सहभाग घेतला होता. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव मविआला दिला. ज्यामध्ये 27 लोकसभा मतदारसंघात वंचितने तयारी केली असल्याचं सांगत त्याची यादीच दिली. मात्र, यापेक्षाही एक महत्त्वाचा प्रस्ताव वंचितने यावेळी दिला आहे. तो म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आघाडीचा उमेदवार म्हणून जागा द्यावी. (vba give election ticket to manoj jarange from jalna lok sabha constituency biggest demand of vba jarange also made a indicative statement)

ADVERTISEMENT

वंचितने केलेल्या या मागणीनंतर आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण आतापर्यंत कोणीही मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी असं थेट म्हटलं नव्हतं. मात्र आता या मागणीनंतर जरांगेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीची मनोज जरांगेंबाबत नेमकी मागणी काय? 

'महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून श्री. मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना कॉमन उमेदवार म्हणून जाहीर करावे.' अशी मागणी वंचितने केली आहे. ज्याबाबत लेखी पत्रच मविआला देण्यात आलं आहे. 

एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच मनोज जरांगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने आता महाराष्ट्रात नवं राजकारण पाहायला मिळणार आहे. याआधी मराठा समाजाने एखादा पक्ष स्थापन करून त्यांच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी चर्चा राज्यभरात होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा> 'मविआ'ची आज अंतिम बैठक, राऊत जागा वाटपावर स्पष्टच बोलले

मात्र, आता मविआचा उमेदवार म्हणून मनोज जरांगे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी वंचितने केल्यामुळे आता याबाबत नेमका मविआ काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

वंचितच्या प्रस्तावावर मनोज जरांगे काय म्हणाले?

दरम्यान, वंचितने जो प्रस्ताव मविआला दिला त्याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले की, 'बाळासाहेब आंबेडकरांचे मला अनेक दिवसांपासून समर्थन आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे त्यांनी माझा विचार केला.. मी माझा समाज सांगेल ते करेन, मी समाजाशी बोलेन आणि ठरवेन.' असं म्हणत मनोज जरांगे यांनीही आता सूचक असं विधान केलं आहे. 

ADVERTISEMENT

वंचितने का केली अशी मागणी? 

मनोज जरांगे हे मराठा आंदोलक म्हणून मागील काही काळात झपाट्याने पुढे आले आहेत. त्यांच्या याच आंदोलनाचा राजकीयदृष्ट्या फायदा करून घेण्यासाठी वंचितने त्यांच्या उमेदवारीची मागणी केली असल्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

27 जागांच्या यादीवर वंचितचं स्पष्टीकरण 

दरम्यान, वंचितने मविआला ज्या 27 जागांवर तयारी केली असल्याचं म्हणत जी यादी दिली होती. त्याबाबत आता स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या मतदारसंघांची यादी ही गेल्या पाच वर्षांपासून ज्या जागांची तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आली होती, त्या जागांची आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याआधीची ही यादी असून, त्या अशा जागा आहेत, ज्या ठिकाणी वंचितला जिंकण्याची खात्री होती. त्यामुळे वंचितने अद्याप किती जागा हव्यात, याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही.

हे ही वाचा> 'मविआची लपवाछपवी..', वंचितचं 'ते' पत्र जसंच्या तसं...

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव मविआला दिला असून, ज्या जागांवर युती होण्याआधी वंचितने तयारी केली आणि जिथे जिंकण्याची खात्री होती, त्या जागांची माहिती विश्वासाने मविआला दिली आहे. वंचितच्या या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आणखी एका बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

असं स्पष्टीकरण हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT