'आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या...', राऊत स्पष्टच बोलले
महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागांचा प्रश्न आज निकाली निघणार असून वंचित बहुजन आघाडीबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्हाला जास्त जागा जिंकायच्या असून जागांचा आकडा वाढवायचा नाही तर जास्त जागा जिंकायच्या असल्याचे स्पष्टपणे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'जागा वाढवायच्या नाहीत, तर जिंकायच्या'

'आमची सगळ्यांची भूमिका तिच'
Sanjay Raut: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज अंतिम बैठक असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेच्या जागांचा आज प्रश्न सुटणार आहे. कारण इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत, त्या सर्वांमध्ये कोणताही संभ्रम नसून आज चार वाजता बैठक होणार असून त्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
जय शाह बीसीसीआयवर का?
खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयवर गेले असते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जागांचा प्रश्न सुटणार
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचा प्रश्न सुटत आला असून आज होणाऱ्या चार वाजताच्या बैठकीत तो तडीला जाणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी आज व्यक्त केला.
कोणताही संभ्रम नाही
मविआच्या झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेतेही उपस्थित होते, त्यामुळे सध्या जागा वाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.