Konkan assembly voting 2024: ठाणे-कोकणातील प्रत्येक मतदारसंघातीच मतदानाची आकडेवारी

रोहित गोळे

कोकण विधानसभा मतदानाची टक्केवारी|Konkan assembly Voting percentage: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. पाहा कोकण विभागात नेमके किती टक्के मतदान झालं आहे.

ADVERTISEMENT

2024 Konkan Assembly Elections Voting: कोकण विभागातील मतदानाची टक्केवारी
2024 Konkan Assembly Elections Voting: कोकण विभागातील मतदानाची टक्केवारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभरात मतदान सुरू

point

ठाणे आणि कोकण विभागात एकूण 39 जांगासाठी मतदान

point

पाहा ठाणे आणि कोकण विभागात किती टक्के मतदान झालं

2024 Live Konkan Assembly election 2024: सिंधुदुर्ग: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यात सर्वत्र मतदान होत आहे. ठाणे आणि कोकण विभागातील एकूण 39 मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे इथे त्यांची कामगिरी कशी राहते आणि शिवसेना (ठाकरे गट) कशी टक्कर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोकण विभागात विधानसभेच्या एकूण 39 जागा असून त्यापैकी अनेक जागी शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) अशी थेट लढत आहे. तसंच कोकणात कोणाची शिवसेना सर्वात वरचढ ठरणार हे देखील या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा>> Supriya Sule: टेक्सटाइल पार्कमध्ये आईला अडवलं, सुप्रिया सुळेंच्या जिव्हारी लागलं.. अजितदादांना भडाभडा सुनावलं!

लोकसभा निवडणुकीत कोकणात आणि विशेषत: तळ कोकणात शिवसेना (ठाकरे गट) यांना अजिबात यश मिळालं नाही. त्यामुळेच या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्याची गरज ठाकरे गटाला आहे. अशावेळी कोकणी माणूस कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कोकण विभागात नेमकं किती टक्के मतदान होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

ठाणे-कोकणातील एकूण 5 जिल्ह्यात किती टक्के झालं मतदान

  1. पालघर जिल्ह्यात 65.95 टक्के मतदान झालं
  2. रायगड जिल्ह्यात 67.23 टक्के मतदान झालं
  3. रत्नागिरी जिल्ह्यात 64.65 टक्के मतदान झालं
  4. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 68.40 टक्के मतदान झालं
  5. ठाणे जिल्ह्यात 56.05 टक्के मतदान झालं

 

>पाहा ठाणे-कोकणातील 39 विधानसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी

 

1 अंबरनाथ 47.75%
2 उल्हासनगर 54.00%
3 कल्याण पूर्व 58.50%
4 डोंबिवली 56.19%
5 कल्याण ग्रामीण 57.81%
6 मुंब्रा कळवा 52.01%
7 मीरा भाईंदर 51.76%
8 ओवळा-माजीवडा 52.25%
9 कोपरी-पाचपाखाडी 59.85%
10 ठाणे शहर 59.01%
11 ऐरोली 51.50%
12 बेलापूर 55.24%
13 भिवंडी ग्रामीण 69.01%
14 शहापूर 68.32%
15 भिवंडी पश्चिम 54.10%
16 भिवंडी पूर्व 49.20%
17 कल्याण पश्चिम 54.75%
18 मुरबाड 64.92%
19 डहाणू 72.50%
20 विक्रमगड 77.75%
21 पालघर 71.05%
22 बोईसर  66.17%
23 नालासोपारा 57.10%
24 वसई 60.46%
25 गुहागर 62.50%
26 रत्नागिरी  63.00%
27 दापोली  65.95%
28 सावंतवाडी  68.00%
29 पेण  63.40%
30 अलिबाग  76.55%
31 कर्जत  74.40%
32 पनवेल  57.45%
33 चिपळूण  68.35%
34 राजापूर  63.00%
35 कणकवली  67.10%
36 कुडाळ  70.20%
37 श्रीवर्धन  60.90%
38 महाड 70.90%
39 उरण  75.99%

 

>दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

 

अंबरनाथ 34.35%
उल्हासनगर 31.24%
कल्याण पूर्व 37.71%
डोंबिवली 42.36%
कल्याण ग्रामीण 40.87%
मुंब्रा कळवा 38.20%
मीरा भाईंदर 39.65%
ओवळा-माजीवडा 37.50%
कोपरी-पाचपाखाडी 44.60%
ठाणे शहर 39.41%
ऐरोली 39.00%
बेलापूर 41.48%
भिवंडी ग्रामीण 47.45%
शहापूर 36.71%
भिवंडी पश्चिम 34.20%
भिवंडी पूर्व 35.71%
कल्याण पश्चिम 36.55%
मुरबाड 41.87%
डहाणू 53.20%
विक्रमगड 49.60%
पालघर 47.63%
बोईसर  47.36%
नालासोपारा 40.96%
वसई 47.64%
गुहागर 49.01%
रत्नागिरी  46.20%
दापोली  50.80%
सावंतवाडी  48.00%
पेण  48.18%
अलिबाग  53.40%
कर्जत  55.80%
पनवेल  41.79%
चिपळूण  52.33%
राजापूर  52.19%
कणकवली  51.30%
कुडाळ  54.00%
श्रीवर्धन  45.29%
महाड 47.13%
उरण  51.35%

 

>सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

अंबरनाथ 14.05%
उल्हासनगर 11.33%
कल्याण पूर्व 17.81%
डोंबिवली 20.29%
कल्याण ग्रामीण 19.82.%
मुंब्रा कळवा 16.29%
मीरा भाईंदर 18.02%
ओवळा-माजीवडा 16.23%
कोपरी-पाचपाखाडी 18.22%
ठाणे शहर 18.86%
ऐरोली 17.11%
बेलापूर 17.89%
भिवंडी ग्रामीण 16.14%
शहापूर 11.33%
भिवंडी पश्चिम 10.57%
भिवंडी पूर्व 15.07%
कल्याण पश्चिम 17.00%
मुरबाड 18.02%
डहाणू 23.01%
विक्रमगड 15.70%
पालघर 19.10.%
बोईसर  19.91%
नालासोपारा 18.54%
वसई 20.81%
गुहागर 24.36%
रत्नागिरी  18.60%
दापोली  23.59%
सावंतवाडी  18.50%
पेण  18.90%
अलिबाग  19.45%
कर्जत  20.10%
पनवेल  16.89%
चिपळूण  24.57%
राजापूर  24.07%
कणकवली  21.35%
कुडाळ  23.00%
श्रीवर्धन  18.22%
महाड 22.67%
उरण  29.26%

> सकाळी 9 वाजेपर्यंतची टक्केवारी

रायगड जिल्हा 7 विधानसभा मतदारसंघ सकाळी 7 ते 9 या कालावधीत 7.55% मतदान

रत्नागिरी वेळ ७ ते ९ जिल्ह्याची टक्केवारी - ८.९६%

मतदार संघ टक्केवारी

दापोली - ८.५४ %
गुहागर - ९.१६%
चिपळूण- १०.१४%
रत्नागिरी - ९.७%
राजापूर- ८.८९%

 

हे ही वाचा>> Amol Kolhe : 'दादा...  मला कोणी गद्दार म्हणत नाही', अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर बारामतीतून वार!

2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp