मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांतवर महिलेचे गंभीर आरोप, संपूर्ण प्रकरण काय?

मुंबई तक

महिलेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाद्वारे सिद्धांत यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्या भेटीगाठी आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट अडचणीत?

point

शिरसाटांच्या लेकाचे महिलेवर गंभीर आरोप

Sidhant Sanjay Shirsat Case : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवत सिद्धांत यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा >> 22 वा मजला, तरूणीची उडी आणि बॉडीचे दोन तुकडे... मुंबईतील विक्रोळीत नेमकं काय घडलं?

महिलेच्या म्हणण्यानुसार, 2018 मध्ये सोशल मीडियाद्वारे सिद्धांत यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांच्या भेटीगाठी आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला. याच आश्वासनावर विश्वास ठेवून 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने दोघांचे लग्न झाले. याचे पुरावे महिलेकडे असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा >> भररस्त्यात तरुणाने महिलेच्या गालावर केलं किस अन् आता खातोय जेलची हवा

महिलेचा आणखी गंभीर आरोप आहे की, या संबंधातून तिची गर्भधारणा झाली होती, परंतु सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला. लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी महिलेला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितले आणि छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला.

पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करेन...

सिद्धांत यांचे आधीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर त्यांनी “तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे कुटुंब उद्ध्वस्त करीन” अशा धमक्या दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp