पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत करता होता 'हे' काम, असं उघड झालं गुपित

मुंबई तक

सिरसामध्ये एका तरुणाच्या तिसऱ्या लग्नाच्या पर्दाफाश त्याच्या पत्नीने केला आहे. पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची देखील एंट्री झाली आहे.

ADVERTISEMENT

पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत करता होता 'हे' काम (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत करता होता 'हे' काम (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

हरियाणा: हरियाणातील सिरसा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे कमलजीत नावाच्या तरुणाला त्याची पत्नी मोनिकाने त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं. कमलजीतचे आधीच दोन लग्न झाली आहेत आणि आता त्याला तिसरे लग्न करायचे आहे. याच कारणास्तव त्याला त्याची दुसरी पत्नी मोनिकाला सोडायचं आहे. पण मोनिका घटस्फोट देण्यास तयार नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मोनिकाचे नोव्हेंबर 2022 साली कमलजीतशी लग्न झाले होते. लग्नानंतर तिला कळले की कमलजीत आधीच विवाहित आहे. असे असूनही, मोनिकाने आक्षेप घेतला नाही आणि दोघांनाही एक वर्षाचा मुलगा आहे. पण 11 महिन्यांपूर्वी कमलजीतच्या आयुष्यात आणखी एका मुलीचा प्रवेश झाला, जिच्याशी तो आता लग्न करू इच्छितो. यासाठी त्याने मोनिकाला घटस्फोट देण्याची तयारी केली आहे.

हे ही वाचा>> IT कंपनीत 25 लाख रुपयांचं पॅकेज, तरी इंजिनिअर तरुणी रस्त्यावर न्यूड होऊन नको ते...

मोनिका सात महिन्यांपासून माहेरीच

गेल्या सात महिन्यांपासून, मोनिका तिच्या माहेरीच राहत होती, तर कमलजीत त्याच्या मैत्रिणीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोनिका तिच्या कुटुंबासह त्या खोलीत पोहोचली. तिथे तिला कमलजीत बेडवर टॉवेल गुंडाळून झोपलेला होता आणि त्याची गर्लफ्रेंड जवळच बसलेली होती.

खोलीत गोंधळ, कमलजीतने केली मारहाण

मोनिकाला पाहून कमलजीतला राग आला आणि तो तिच्याशी भांडू लागला. हे प्रकरण इतके वाढले की त्याने मोनिकाला मारहाण देखील केली. आवाज ऐकून मोनिकाच्या कुटुंबातील सदस्य खोलीत पोहोचले, त्यानंतर कमलजीतने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची टीमही घटनास्थळी पोहोचली आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. 

हे ही वाचा>> एक्सप्रेस वेवरील अश्लील Video.. नेत्याने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं!

मोनिका आणि तिच्या कुटुंबाचे गंभीर आरोप

मोनिका आणि तिच्या कुटुंबाने कमलजीतवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मोनिका म्हणाली की, कमलजीत तिला सतत छळत असे आणि मारहाण करत असे. ती म्हणाली, "मी सात महिन्यांपासून माझ्या आईवडिलांच्या घरी आहे, आणि तो त्या मुलीसोबत इथे राहतोय. तो मला सोडून जाण्याबद्दल बोलत आहे, पण मला घटस्फोट नको आहे." मोनिकाची बहीण कुमकुम हिनेही कमलजीतवर टीका केली आणि तिच्या बहिणीसोबत असे वागल्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे असंही म्हटलं.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp