हसावं की रडावं! प्रेयसीने प्रियकरासाठी केली चोरी, कारण ऐकूण व्हाल चकीत
Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीला आणि तिच्या प्रियकराला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिला ज्या घरात साफसफाईचं काम करत होती त्याच घरात लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घरात काम करणाऱ्या मोलकरणीला आणि तिच्या प्रियकराला चोरीच्या आरोपाखाली अटक

चोरीमागचं धक्कादायक कारण ऐकूण हसावं की रडावं असा प्रश्न निर्माण होत आहे
Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीला आणि तिच्या प्रियकराला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिला ज्या घरात साफसफाईचं काम करत होती त्याच घरात लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. चोरीमागचं धक्कादायक कारण ऐकूण हसावं की रडावं असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्या प्रियकरासाठी प्रेयसीनं चोरी केल्याचं कारण समोर आलं आहे.
हेही वाचा : भररस्त्यात तरुणाने महिलेच्या गालावर केलं किस अन् आता खातोय जेलची हवा
नेमकं काय होतं प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील कोतवाली येथील काजीपुरा परिसरातील रहिवासी अरिवा आणि तिचा प्रियकर अरुण सोनी यांच्यातील प्रेम प्रकरण ऐकूण सर्वच चकीत झाले आहेत. अरुणची मैत्रीण अरिवा ही एका घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. प्रियकरासाठी तिने घरमालकाच्या तिजोरीतील सर्व सामान लंपास केलं. दरम्यान, मोलकरणीच्या कामासाठी तिला प्रतिमाह 800 रुपये मिळायचे. चोरीला गेलेले दागिने आणि रोख रक्कमेतून, अरिवने सुरुवातीला दागिने विकले आणि त्यातून 1.25 लाख रुपयांची एक नवीन मोटारसायकल खरेदी केली. तिने उर्वरित दागिने तिच्या प्रियकराच्या घरी लपवून ठेवले होते. या पैशांचा वापर ते मौज मजेसाठी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
चोरीचं प्रकरण कसं आलं समोर?
ज्या घरमालकाचे दागिने लंपास करण्यात आले होते त्यांचं नाव सगीर आहे. ते म्हणाले की, त्यांच्या घरातून याआधीही पैसे चोरीला गेले होते. पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र, त्यांच्या तिजोरीतून पुन्हा पैशांचं बंडल चोरीला गेलं. त्यावरुन त्याच्या मनात संशयाची पाल चुकचूकली. घरमालकाने तिजोरी उघडली तेव्हा त्या कपाटात आई आणि बहिणीचे अनेक तोळ्याचे दागिने गायब झाले होते. संबंधित प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती. संशयाच्या आधारे, जेव्हा पोलिसांनी घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या अरिवाची चौकशी केला असता सत्य बाहेर आलं.
अरिवाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दागिने परत मिळवण्यासाठी पोलिसांनी अरिवाला तिचा प्रियकर अरुण सोनी याच्या घरी नेलं. दरम्यान, तिचा प्रियकर अरुणने घरी ठेवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आणि प्रेयसीशी असणाऱ्या संबंधाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
हेही वाचा : मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांतवर महिलेचे गंभीर आरोप, संपूर्ण प्रकरण काय?
दरम्यान, दागिने विकून खरेदी केलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी अरिवा आणि तिचा प्रियकर अरुणला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.