Sharad Pawar : ''सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो''; पवारांनी बारामतीतून विधानसभेसाठी फुंकले रणशिंग

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar big statement on vidhan sabha election 2024 baramati ajit pawar ncp maharashtra politics
शरद पवार यांनी हे विधान करून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.
social share
google news

Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार (Sharad Pawar) शेतकरी, कामगार वर्ग आणि  सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली आहे. त्यात ''केंद्रातील व राज्यातील सरकार आमच्या हातात नाही आहे. पण तुम्ही लोकसभा निवडणुकीला काम केले तसे विधानसभेच्या निवडणुकीला (Vidhan Sabha) काम केले तर सत्ता कशी हातात येत नाही, हे मी पाहतोच'', असे विधान शरद पवार यांनी केले आहे. बारामतीतून (Baramati) शरद पवार यांनी हे विधान करून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.  (sharad pawar big statement on vidhan sabha election 2024 baramati ajit pawar ncp maharashtra politics)

ADVERTISEMENT

शरद पवार तीन दिवसांपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी सर्वसामान्याच्या व्यथा समजून घेताना शरद पवारांनी हे विधान केले आहे. या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

हे ही वाचा : Member of Parliament Salary: खासदारांना असतो गलेलठ्ठ पगार, पेन्शन किती मिळते?

शरद पवार बारामतीतली निरावागज येथील एका सभेत बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, केंद्रातील व राज्यातील सरकार आमच्या हातात नाही आहे. पण लोकसभेत जसे आपण काम केले, तसे काम जर विधानसभेत केले, तर सत्ता कशी हातात येत नाही, मी पाहतोच. आणि राज्य सरकार हातात आलं तर जनतेची दुखणी सोडायला वेळ लागणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. नेत्याने काही केले नाही, पण मी तुमच्या पाठिशी उभा राहणार आहे. आपण एका विचाराने राहुन या गोष्टी दुरूस्त करू असे शरद पवार यांनी विधान करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : MLC Election 2024 : आमदार फुटण्याचा धोका! महायुती-मविआ किती जागा जिंकणार?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT