MLC Election 2024 : आमदार फुटण्याचा धोका! महायुती-मविआ किती जागा जिंकणार?
Maharashtra MLC Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही निवडणूक धक्का देणारी ठरू शकते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२४

महायुतीची (भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस) ताकद किती

महाविकास आघाडीकडे किती आहेत आमदार?
MLC Election 2024 : विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यामुळे या निवडणुकीतही आमदार फुटण्याची धोका आहे. 11 जागांसाठी निवडणूक होत असली, तरी महायुती आणि महाविकास आघाडी किती जागा जिंकू शकते? किती ताकद आहे? (Maharashtra MLC Election 2024 What is Mahayuti and Maha Vikas Aghadi political Calculations)
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होत आहे. भाजपचे 4, काँग्रेसचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 1, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 आणि शेतकरी कामगार पक्षाचा 1 अशा 11 आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार किती आहे पहा खाली...

हेही वाचा >> मराठा आरक्षणासाठी आत्महत्या! सुसाईड नोटमध्ये भुजबळ, पंकजा मुंडेंचं नाव
याव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडी 3 आमदार, समाजवादी पार्टी 2 आमदार, एमआयएम 2 आमदार, प्रहार 2 आमदार, मनसे 1 आमदार, माकप 1 आमदार, शेकाप 1 आमदार, स्वाभिमानी पक्ष 1 आमदार, रासप 1 आमदार, जनसुराज्य 1 आमदार, क्रां.शे.प. 1 आमदार आणि अपक्ष 13 आमदार असे सगळे मिळून विधानसभेत सध्या 274 आमदार आहेत.