Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पंकजा मुंडे, भुजबळ, शेंडगे, तायवाडेंची नावे
Prasad Dethe Suicide : मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी प्रसाद देठे यांनी एक चिठ्ठी लिहली आहे आणि फेसबूक लाईव्ह देखील केले आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी मुद्दा पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
Prasad Dethe Suicide : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण मिळवून देण्याच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या मराठा तरूणाचे नाव आहे. प्रसाद देठे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी फेसबुक लाईव्ह आणि सुसाईड नोट लिहली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी भापजच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, (Pankaja Munde) ओबीसी नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे यासह इतर नेत्यांची नावे लिहली आहेत. (prasad dethe suicide for maratha reservation demand suicide note letter facebook live pankaja munde manoj jarange patil maratha reservatation)
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणासाठी आता आणखी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. प्रसाद देठे असे या आत्महत्याग्रस्त तरूणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी प्रसाद देठे यांनी एक चिठ्ठी लिहली आहे आणि फेसबूक लाईव्ह देखील केले आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी मुद्दा पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुसाईड नोट जशीच्या तशी
जयोस्तु मराठा...
मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजा ताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, T.P मुढे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळून द्या विनंती आहे तुम्हाला.
हे वाचलं का?
हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आलं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्व:खुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, विनंती आहे तुम्हाला.
माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे. धीट राहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद
ADVERTISEMENT
प्रसाद देठे फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणाले?
प्रसाद देठे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी फेसबुक लाईव्ह सुद्धा केलं आहे. या लाईव्हमध्ये ते काय म्हणालेत ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
जरांगे पाटील यांचा एक आदेश आला की लाखोच्या लाखो लोक रस्त्यावर उतरतील, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, आत्महत्या न करता समोरच्याला मारण्याच्या इराद्याने उतरतील, मग तुम्हीच बघा आता काय करायचं आहे.
कारण आज लक्ष्मण हाके पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे आतापर्यंत चारवेळा उपोषणाला बसले आहेत, पण त्या तिकडे कधी अंतरावली सराटीला गेल्या नाहीत. पण लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी वडिगोद्रीला दोघे जण बहिण भाऊ जाऊन आलेले आहेत. आणि पंकजा ताईंच्या दोन तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केलेल्या, त्यामुळे त्या त्यांच्या घरी सांत्वन करायला गेल्या.
मराठा समाजाच्या युवकांच्या देखील इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत. उद्या जर मी मेलो तर पंकजा ताई माझ्या घरी येणार आहेत का? मला पण तीन लेकरं आहेत, त्या लेकरांचं काय होईल, कसं होईल? उद्या पंकजा ताई माझ्या घराच्यांच्या अश्रू पुसायला येणार आहेत का? पंकजा ताई, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे आणि प्रकाश शेंडगे यांना जसं त्यांच्या समाजात दिसतयं. तसं त्यांनी इतर समाजाच्या युवकांचे प्रश्न त्यांनी बघावेत.
प्रसाद देठेच्या फेसबूकला सगळं दिसतंय. ही माझी कंपनी हे माझे विश्व. नाईटला इथे काम करतोय, दिवसाही कुठेतरी काम करावं लागतं. 24 तास काम करून सुद्धा लेकरांच भागत नाही. ही माझीच नाही सगळ्यांचीच व्यथा आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी सुद्धा थोडासा अभ्सास करावा. इतर वाड्या वस्त्यांमध्ये न फिरता बाकीच्या ठिकाणी सुद्धा फिरावं. मराठा समाजाच्या युवकांच्या अडीअडचणी समजून घ्यावा,अशी विनंती देठे यांनी यावेळी केली होती.
दरम्यान प्रसाद देठे यांच्या या आत्महत्येच्या घटनेने मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होतं आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याचीही शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT