अकोला : आधी दोघींनी रील शूट केली, नंतर जिवलग मैत्रिणीच्याच घरात घुसून लाखोंचे दागिने अन् पैसे लंपास...

मुंबई तक

अकोल्यातून चोरीचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका रील क्रिएटर तरुणीने आपल्या रीलस्टार मैत्रिणीच्या घरात घुसून लाखो रुपयांचे दागिने आणि पैसे चोरल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

मैत्रिणीच्या घरात घुसून लाखोंचे दागिने केले लंपास...
मैत्रिणीच्या घरात घुसून लाखोंचे दागिने केले लंपास...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अकोल्यातील चोरीचं धक्कादायक प्रकरण

point

जिवलग मैत्रिणीच्याच घरात घुसून लाखोंचे दागिने अन् पैसे लंपास...

Akola Crime: अकोल्यातून चोरीचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका रील क्रिएटर तरुणीने आपल्या रीलस्टार मैत्रिणीच्या घरात घुसून लाखो रुपयांचे दागिने आणि पैसे चोरण्याचा कट रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, समीक्षा गवई अशी आरोपी तरुणीची ओळख समोर आली असून तिने नेहा सावडेकर नावाच्या तिच्या जवळच्या मैत्रिणीचाच विश्वासघात केला. खरं तर, दोघी अत्यंत चांगल्या मैत्रिणी असून त्या एकमेकींच्या शेजारीच राहत होत्या. त्यामुळे, दोघींचं एकमेकींच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. 

मिळालेल्या माहितीनुसार, याच विश्वासाचा फायदा घेत समीक्षाने नेहाच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. जवळपास एक महिन्यापासून तिने या चोरीची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे. इंस्टाग्राम आणि फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील बनवत असताना त्यांच्या चांगले मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले मात्र, याच मैत्रीचं नंतर विश्वासघातात रूपांतर झालं. 

मैत्रिणीच्या घरातून सोनं आणि पैसे केले लंपास... 

पोलिसांनी सांगितलं की, 12 फेब्रुवारी रोजी समीक्षाने नेहाला फोन करून तिला आपल्या घरी बोलवलं आणि तिचे काही मित्र सुद्धा घरी आले असून रील शूट करायचं असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर, जवळपास 1 ते 1.5 तास त्यांनी वेगवेगळ्या अँगलने रील शूट केलं आणि त्यादरम्यान समीक्षा कपडे बदलण्याचं कारण सांगून तिथून निघून गेली. त्यावेळी, समीक्षा थेट शेजारी नेहाच्या घरी गेली आणि मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम चोरल्याचं तपासात समोर आलं. चोरी केल्यानंतर ते सोनं आणि चोरलेली रोख रक्कम तिच्या प्रियकर आणि मित्राला दिली. 

हे ही वाचा: बीड: पतीला दारूचं व्यसन अन् सासू-सासऱ्यांचे टोमणे... अंबाजोगाईत विवाहितेनं संपवलं आयुष्य! तिघांवर गुन्हा दाखल

काही वेळानंतर, नेहा तिच्या घरी गेली आणि त्यानंतर तिला मोठा धक्का बसला. घरातील तिजोरीतून अंदाजे 21 लाख रुपयांचे दागिने आणि 90 हजार रुपयांची रक्कम गायब होती. नंतर, नेहाने त्वरीत पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्या दिवशी घटनास्थली उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींच्या हालचाली आणि मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात आले. तपासादरम्यान असं दिसून आलं की समीक्षा रील शूटिंगदरम्यान काही मिनिटांसाठी एकटीच बाहेर गेली होती आणि पोलिसांसाठी हा मोठा पुरावा ठरला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp