Sharad Pawar : शरद पवारांनी अजित दादांच्या परतीचे दोर कापले, काय म्हणाले?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

sharad pawar reaction on ajit pawar maha vikas aghadi meeting y b center ncp politics
भाजपला जो काही अनुभव आला, त्यांनी तो सांगितला.
social share
google news

Sharad Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. यातूनच अनेक आमदार, नेते पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यात आता पत्रकारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पक्षात घेणार का? असा सवाल केला होता. यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीन शब्दात उत्तर दिले आहे. नेमकं पवार काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.  (sharad pawar reaction on ajit pawar maha vikas aghadi meeting y b center ncp politics) 

ADVERTISEMENT

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी शरद पवारांना अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल केला होता? यावर शरद पवारांनी प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट उत्तर दिलं होतं. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या परतीचे दोरं कापले आहे. 

हे ही वाचा : T20 World Cup: पाकिस्तानचा झाला करेक्ट कार्यक्रम! अमेरिकेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

ऑर्गनायझर या साप्ताहिकात अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड वॅल्यु कमी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.यावर शरद पवार म्हणाले, भाजपला जो काही अनुभव आला, त्यांनी तो सांगितला. यात आम्ही काय बोलू इच्छित नाही,असे शरद पवारांनी सांगितले. 

हे वाचलं का?

शरद पवारांचा मोदींना चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 18  सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींच्या जितक्या अधिक सभा आणि दौरे होतील.  तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे त्यांना ही धन्यवाद देणे माझं कर्तव्य समजतो, अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचलं. 

हे ही वाचा : 'मंगळसूत्र, वोट जिहाद अन् नरेटिव्ह...', ठाकरेंनी चढवला PM मोदींवर हल्ला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT