Mumbai Heavy Rain : रस्त्यांचे कालवे, स्टेशनवर धबधबे; मुंबईतील ही दृश्ये बघा
मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच कोसळलेल्या सरींनी शहरातील अनेक भागात दयनीय अवस्था दिसली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांत पावसाचे प्रचंड पाणी साचले.
ADVERTISEMENT

Heavy Rain Alert in Mumbai : मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच कोसळलेल्या सरींनी शहरातील अनेक भागात दयनीय अवस्था दिसली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांत पावसाचे प्रचंड पाणी साचले. तर अनेक ठिकाणी वाहनही पाण्यात अडकली. तर घाटकोपर भागात बहुमजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. पहिल्या पावसामुळे मुंबईत पाणी साचलेल्या विविध ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
तब्बल दोन आठवडे उशिराने आलेल्या पावसाने मुंबईत जोरदार सलामी दिली. शनिवारी पावसाचा जोर इतका होता की, मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबई, मुंबई उपनगरात शनिवारी (24 जून) पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळपर्यंत अनेक भागात प्रचंड पाणी भरले होते.
मुंबईतील पावसाचे व्हिडीओ व्हायरल
पहिल्या पावसात मुंबईतील मान्सून पूर्वतयारीच्या कामाचे पितळ उघडे पडल्याचे दिसले. अंधेरीतील सबवे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाण्याखाली गेला. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली. सबवे मध्ये रिक्षा,चारचाकी अडकल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काहींनी गाड्या दोरीने बांधल्याची दृश्येही समाजमाध्यमांवर चांगली व्हायरल झाली.
@mybmc condition outside saki naka metro station after first rain @Mi_DilipLande@CMOMaharashtra#MumbaiRains pic.twitter.com/2tXph0Wp9Q
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) June 24, 2023