‘कमळबाईची पालखी…’ ,’त्या’ बॅनर्संवरून शिवसेनेचा (UBT)पलटवार, काय घडलं?
‘मी कमळबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचे बॅनर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लावलं आहे. यातून शिंदेंच्या सेनेला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
ADVERTISEMENT
Shiv Sena ubt Banner Marathi : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीवेळी मुंबईत शिवसेनेला (युबीटी) डिवचणारे काही बॅनर्स झळकले. हे बॅनर्स होते बाळासाहेब ठाकरेंच्या एका विधानाचे. याच बॅनर्संना आता ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर दिलंय. त्यामुळे मुंबईत बॅनर पॉलिटिक्स चांगलंच रंगताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
इंडिया या नावाने विरोधकांनी आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या माध्यमातून मोट बांधण्याचं काम सुरूये. पाटणा, बंगळुरू आणि मुंबई अशा तीन ठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. पण, मुंबईतील बैठकीआधी काही बॅनर्स झळकले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य, काय होतं बॅनरवर?
इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी जे बॅनर झळकले, त्यातून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच टार्गेट केलं गेलं होतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे. ठाकरे काँग्रेससोबत गेल्यावरूनच त्यांना घेरण्यात आलं.
हे वाचलं का?
हेही वाचा >> चिमुकल्याने दिली उद्धव ठाकरेंना शिदोरी; म्हणाले, ‘माझ्याकडे शब्दच नाहीत’
‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’, हे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलेल्या या विधानाचे हे बॅनर्स होते. आता याच बॅनर्संना ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
‘मी कमळाबाईची पालखी…’
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काही बॅनर्स लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेची आठवण करून देत ठाकरेंच्या शिवसेने पलटवार केलाय. शिवसेना भवनाबाहेरच हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’, असा बॅनर्सवरील मजकूर आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> डेबिट कार्डची लागणार नाही गरज, UPI द्वारेच ATM मधून काढता येणार पैसे!
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय संघर्ष सातत्याने दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव टाकरेंना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे आता ठाकरेंच्या शिवसेनेनंही बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका मांडत शिंदेंना घेरलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT