मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

violence in mumbai clash between two groups during ram navami shobha yatra in malvani
violence in mumbai clash between two groups during ram navami shobha yatra in malvani
social share
google news

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती मालाडमधील मालवणी भागात होता होता टळली. पोलिसांनी वेळीच कृती केल्याने तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. मालाडमधील मालवणी भागात राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रा जात असताना अचानक तणाव निर्माण झाला होता. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती झोन 11 पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी दिली.

गुरुवारी (30 मार्च) मालवणी भागात राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. शोभायात्रा एका मशिदीसमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात्रेदरम्यान एका तरुणाने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

हेही वाचा – राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी लागलीच कृती केली आणि परिस्थिती पूर्ववत केले. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही जणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती मालवणी टळली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

stone pelting in ram navami shobha yatra in mumbai
वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी लागलीच कृती केली आणि परिस्थिती पूर्ववत केले.

मोठ्या आवाजात गाणे वाजण्याला आक्षेप?

पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आपल्या वृत्ता म्हटलं आहे की, शोभायात्रा पुढे जात असताना काही जणांनी डीजेवर वाजवल्या जात असलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यांवर आक्षेप घेतला. त्यामुळे दोन गट आमने सामने आले होते. दरम्यान, यावेळी दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आयोजकांकडून करण्यात आला, पण असं काही घडलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?

20 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मालवणीत शोभायात्रेदरम्यान दोन गटात झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात 300 पेक्षा जास्त अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मंगलप्रभात लोढांनी घेतली भेट

शोभायात्रेत तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना हलक्या स्वरुपात बळाचा वापर करावा लागला. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. दरम्यान, लोढा यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT