छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी रांगोळी, तब्बल…
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना देण्यात आली आहे. याठिकाणी 25 हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळी साकारलीय. शिवाजी महाराजांची कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 60 क्विंटल रांगोळी आणि आठ दिवसांचा वेळ लागला. माजलगाव परिसरात सुंदर […]
ADVERTISEMENT

शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना देण्यात आली आहे.
याठिकाणी 25 हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळी साकारलीय.
शिवाजी महाराजांची कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 60 क्विंटल रांगोळी आणि आठ दिवसांचा वेळ लागला.
माजलगाव परिसरात सुंदर भव्य रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
माजलगाव शहरातील 8 कलाकारांनी ही प्रतिमा रांगोळीद्वारे साकारली आहे.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात आली आहे.