Fact Check: मुंबईतील दादर चौपाटी खरंच बंद आहे का? 'तो' WhatsApp मेसेज अन् पोलिसांकडून सगळा विषयच क्लिअर!
Dadar Chowpatty Fack Check News : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील दादर चौपाटी बंद असल्याच्या मेसेजचं सत्य काय?

मुंबई पोलिसांनी एक्सवर नागरिकांना केलं मोठं आवाहन

चौपाटी बंद असल्याचे खोटे मेसेज होतायत व्हायरल
Dadar Chowpatty Fack Check News : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु, भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडीओ आणि मेसेज पसरवले जात आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध दादर चौपाटी बंद असल्याचा फेक मेसेजही व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. मात्र, दादर चौपाटी बंद असल्याचं व्हाट्सअॅपवर खोट्या मेसेजद्वारे सांगण्यात आलंय. याविषयी फॅक्ट चेक केलं असता, दादर चौपाटी सर्व नागरिकांसाठी खुली असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांनीही दादर चौपाटी सर्व नागरिकांसाठी खुली असल्याचं एक्सवर म्हटलंय.
हे ही वाचा >> What is S-400 Defence System: भारताचं हे आहे 'सुदर्शन चक्र', पाकला कळण्याआधीच खेळ होतो खल्लास.. खासियत तर विचारूच नका!
मुंबई पोलिसांनी एक्सवर याबाबत नागरिकांना जाहीर आवाहन केलं आहे. दादर चौपाटी नागरिकांसाठी खुली असून कोणीही व्हाट्सअॅपवर पसरवलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नका. दादर चौपाटी बंद झाल्याबाबत व्हाट्सअॅप ग्रुपवर खोटी माहिती पसरवली जात आहे. सर्व नागरिकांसाठी दादर चौपाटी सुरु राहणार आहे, याची नोंद घ्यावी.

सरकारी वेबसाईट्सवर शेअर केलेल्या माहितीवरच मुंबईकरांनी विश्वास ठेवावा. कोणतीही खातरजमा न करता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजेवर विश्वास ठेऊ नका. फॉरवर्डेड मेसेज आणि फेक वेबसाईट्सवरून पसरवलेले मेसेज वाचणे टाळा. तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल, असं मुंबई पोलिसांनी एक्सवर म्हटलंय.