पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार! 'या' भागात वादळी वारे घालणार धुमाकूळ
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होत आहे. काही भागात सूर्य आग ओकताना दिसत आहे. काल गुरुवारी 8 मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
तर उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 24°C च्या आसपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. अशातच आज 9 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारचं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> एकीकडे एअर स्ट्राईक, नंतर ड्रोन हल्ला, आता धरणाचे दरवाजे उघडले... पाकिस्तानला तिसरा धक्का?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात.
हे ही वाचा >> SSC 10th Result 2025 : विद्यार्थ्यांनो! दहावीचा निकाल लवकरच..या लिंकवर डाऊनलोड करा मार्कशीट
परभणी, बीड, हिंगोलीत कोरडं हवामान राहू शकतं. तसच अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिमसाठी हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. तसच गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती.