ATM खरंच बंद होणार? एटीएमबाहेर रांगा, पण फॅक्ट चेकमध्ये काय समोर आलं वाचा...

मुंबई तक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर एक मेसेज वेगानं पसरतोय. भारत-पाकिस्तान तणाव आणि अलीकडील लष्करी कारवाया लक्षात घेता, सरकारने पुढील काही दिवसांसाठी एटीएम बंद करण्याचा आदेश निर्णय घेतलाय, असा एका मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला

point

तणाव वाढलेला असताना व्हायरल मेसेजचंही पेव फुटलं

point

ATM बंद राहणार असल्याचा मेसेज खरा की खोटा?

ATM Closed Viral Message Fact Check : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्हॉट्सअॅप आणि सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की, पुढचे 2-3 दिवस देशभरातील एटीएम बंद राहतील. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे घोषित केलं आहे.

हे ही वाचा >> What is S-400 Defence System: भारताचं हे आहे 'सुदर्शन चक्र', पाकला कळण्याआधीच खेळ होतो खल्लास.. खासियत तर विचारूच नका!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर एक मेसेज वेगानं पसरतोय. भारत-पाकिस्तान तणाव आणि अलीकडील लष्करी कारवाया लक्षात घेता, सरकारने पुढील काही दिवसांसाठी एटीएम बंद करण्याचा आदेश निर्णय घेतलाय, असा एका मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय. काही मेसेजमध्ये असाही दावा करण्यात आलाय की आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बँका आणि रोख सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहेत. या दाव्यांमुळे लोकांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण झाली.

हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित, पुन्हा कधी सुरू होणार?

व्हायरल होणारे हे मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचं PIB ने म्हटलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे या व्हायरल मेसेजची तथ्य तपासणी केलीये. पीआयबीने स्पष्ट केलं की, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएम किंवा बँकिंग सेवा बंद करण्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. पीआयबी फॅक्ट चेकनं म्हटलं आहे की, सोशल मीडियावरील एटीएम 2-3 दिवसांसाठी बंद राहतील असा दावा खोटा आहे. सर्व एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे खोटे संदेश पसरवू नका, आणि त्यावर विश्वास ठेवू नका.

जनतेनं सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

पीआयबीनं लोकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे असे मेसेज शेअर करणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. फॅक्ट चेक युनिटने म्हटलं आहे की, "अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे देशात गोंधळ आणि दहशत पसरू शकते. कृपया फक्त सरकार, आरबीआय किंवा विश्वसनीय बातम्यांच्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवा." पीआयबीने असंही सुचवलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला असा संशयास्पद मेसेज मिळाला, तर तो पीआयबीच्या फॅक्ट चेक पोर्टल (factcheck.pib.gov.in) वर त्याची सत्यता तपासू शकता. पीआयबीच्या अधिकृत एक्स हँडल (@PIBFactCheck) वरही  तुम्ही संपर्क साधू शकता.

या गोष्टींची काळजी घ्या...

  • फक्त अधिकृत स्रोतांकडून (RBI, PIB, सरकारी वेबसाइट) माहिती मिळवा.
  • पीआयबी फॅक्ट चेक पोर्टलवर संशयास्पद संदेशांची सत्यता तपासा.
  • घाबरू नका आणि अनावश्यक पैसे काढू नका, यामुळे एटीएममध्ये गर्दी होऊ शकते.
  • व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर येणारे असत्यापित संदेश फॉरवर्ड करू नका.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इतरांनाही याची जाणीव करून द्या.
     

हे वाचलं का?

    follow whatsapp