"ठाकरे ब्रँड इज ब्रँड" राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ट्विट करत...
Raj And Uddhav Thackeray : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोघेही भाऊ एकत्र येतील अशी माहिती दिली आहे. ठाकरे हे ब्रँड आहेत असं म्हणत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र?
संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत
Raj And Uddhav Thackeray : भाजपने राज्यातील शिक्षण धोरणांतील शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय घेतलाय. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकलं आहे. अशातच आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोघेही भाऊ एकत्र येतील अशी आशा व्यक्त केलीय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे ब्रँड इज ब्रँड", असे लिहित त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दर्शवलेत.
हेही वाचा : भाजपला मोठा धक्का, डोंबिवलीतील दिग्गज नेता ठाकरेंच्या शिवसेनेत?
'ठाकरे ब्रँड इज ब्रँड'
भाजपने राज्यातील शिक्षण धोरणांत शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीबाबत निर्णय घेतलाय. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकलं आहे. अशातच आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोघेही भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. 'ठाकरे बंधू ब्रँड आहेत', असे लिहित त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दर्शवलेत.
येत्या 29 जून रोजी शासन निर्णयाची होळी करत, 7 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार असं म्हणत दीपक पवार यांनी या लढ्याची घोषणा केली. तर हुतात्मा चौकातील स्मारकास्थळी अभिवादन करत लढ्याची घोषणा केली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे.










