नागपूर : फेब्रुवारी महिन्यात शहरात एकही हत्येचा गुन्हा नाही, नागरिकांसाठी आनंदाची बातमी
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत होती. परंतू नागपूर पोलिसांनी यावर विशेष उपाययोजना आखून या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. या विशेष प्रयत्नांना मिळालेलं फळ म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये एकाही हत्येच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर हे क्राईम […]
ADVERTISEMENT

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत होती. परंतू नागपूर पोलिसांनी यावर विशेष उपाययोजना आखून या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. या विशेष प्रयत्नांना मिळालेलं फळ म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये एकाही हत्येच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाहीये.
गेल्या काही महिन्यांपासून नागपूर हे क्राईम कॅपिटल म्हणून चर्चेत येत होतं. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होत असलेल्या शहरांमध्ये नागपूरचं नाव आघाडीवर होतं. त्यातच काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात हत्याकांडाच्या काही घटना समोर आल्या ज्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. परंतू पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पाचही झोनचे पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची टीम तैनात करून गुन्हेगारांवर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. याचसोबत दामिनी पथकामार्फत महिलांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला.
सामान्य जनतेच्या विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश आले त्यामुळे सामान्य नागपूर करांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया नागपूर चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुंबई तक ला दिली आहे.