Mumbai Tak /बातम्या / Cough Syrup : पालकांनो सावधान! राज्यात कफ सिरप बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द
बातम्या राजकीय आखाडा

Cough Syrup : पालकांनो सावधान! राज्यात कफ सिरप बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द

Maharashtra 6 cough syrup companies Licenses cancelled : मुंबई : राज्यात दुषित हवेमुळे प्रदुषण वाढले आहे. या प्रदुषणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच सर्दी खोकल्याचा त्रास होतोय. या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेकजण कफ सिरपचा वापर करत आहेत. अशा नागरीकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण राज्यात कफ सिरप (cough syrup) बनवणाऱ्या 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. विधानसभेत या मुद्दयावर भाजपने लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यानंतर या कफ सिरप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (maharashtra 6 cough syrup companies licence cancelled minister sanjay rathod answer in assembly attention notice)

भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे गांबियामधील (Gambian Children’s Death) 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उजबेकिस्तानने केला होता. ही बाब WHO जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली होती. या घटनेवर भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत कारवाईची मागणी केली होती.

संदीप देशपांडे हल्ला: दोघांना भांडूपमधून घेतलं ताब्यात, नेमकं कनेक्शन काय?

औषधांची गुणवत्ता तपासणी होतच नाही

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या औषधाच्या गुणवत्ता तपासण्या झाल्यानंतरच जागतिक बाजारपेठेत पाठवणे बंधनकारक असताना, राज्यातील 200 औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणाऱ्या 2000 पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी 2023 मध्ये आढळून आले होते. त्यामुळे या 200 औषध उत्पादकांची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करत कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी लक्षवेधीत केली होती. तसचे सदर घटना गंभीर असून या प्रकरणी सदर कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील त्यांनी केली.

84 कंपन्यांची तपासणी

या लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांनी सांगितले की, WHO ने गांबियामधील 66 मुलांच्या मृत्युवरून ऑक्टोबर 2022 मध्येच अलर्ट जारी केला होता. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) 7 ऑक्टोबर 2022 रोजी तपासणी मोहिम हाती घेतली होती. यामध्ये 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली. ज्या उत्पादकांकडे स्थिरता चाचणी मध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत अशा एकुण 27 कंपन्या आढळून आल्या आहेत. त्यांच्याविरूद्द आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

‘सरपटणारा प्राणी, कॉण्ट्रक्ट किलर..’ निवडणूक आयोगासह मोदी-शाहांवर घणाघात

दरम्यान राज्यात एकूण 996 अॅलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी 514 उत्पादक निर्यात करतात. तसेच गेल्या वर्षभरात 8 हजार 259 किरकोळ विक्रेत्यांची ही तपासणी करण्यात आली असून 2 हजार परवाना धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर 424 परवाने रद्द करत 56 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले. तसेच हा विषय गंभीर असून याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही ही मंत्र्यांनी दिली.

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…