मुंबईत एक मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. ४५ ते ५९ वयोगटातील आजारी असलेल्या लोकांनाच लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जातंय. मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळताना पहायला मिळतोय. दरम्यान, अंधेरीच्या कोविड सेंटरमध्ये एका ६५ वर्षीय व्यक्तीचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे.
लसीचा डोस घेतल्यानंतर या व्यक्तीला चक्कर आली. यानंतर या व्यक्तीला आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतू संध्याकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या व्यक्तीच्या मृत्यूमागचं नेमकं पोस्ट मार्टम रिपोर्ट आणि समितीच्या अहवालानंतर समोर येईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
नियम पाळा नाहीतर मुंबईतही लॉकडाउन – पालकमंत्री अस्लम शेख
मुंबईत जानेवारी महिन्यापासून सुरु झालेल्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत शहरात ३ लाख ९० हजार ३८ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आलेली आहे. ज्यात अनेक नेत्यांचाही सहभाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली कोरोनीच लस घेतली आहे.
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती